हैदराबाद : वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण (Hyderabad Student Beat) करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हायरल व्हिडीओत विद्यार्थी ‘जय माता दी’ अशी घोषणा देतो. त्यानंतर ‘अल्ला हू अकबर’ अशीही घोषणा हात उंचावून देतो. यावेळी समोर असलेला एक तरुण घोषणा देणाऱ्या तरुणाच्या कानशिलात लगावतो. इतकंच नव्हे तर इतरही तरुण या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करताना दिसून आलेत. मारहाणीचा सदर व्हिडीओ (Crime News Video) समोर आल्यानंतर अखेर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतलीय.
मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव हिमांक बन्सल असल्याचं कळतंय. आयसीएफएआय लॉ स्कूलचा विद्यार्थी असलेल्या या विद्यार्थ्याला तरुणांनीच घोषणा देण्यासाठी जबरदस्ती केली होती, असा आरोप करण्यात आलाय. कॉलेजातील सीनिअर विद्यार्थ्यांनी तरुणासोबत हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात केला गेलाय.
या व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांची आता कसून चौकशी केली जातेय. या संपूर्ण घटनेप्रकरणी एकूण 12 जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना 1 आणि 2 नोव्हेंबर दरम्यान घडली असल्याचं कळतंय.
A group of Muslim students assaulted a fellow student Himank Bansal, a Hindu, and forced him to chant Allah Hu Akbar. The incident is from ICFAI law school, Hyderabad & dated around 2nd Nov 2022. Most of the leftists, Indian media & politicians are shamelessly quiet! pic.twitter.com/3J2JMQRbxI
— Yadu Singh (@dryadusingh) November 14, 2022
सायबराबाद पोलिस या मारहाण प्रकरणी पुढील तपास करत आहेत. सुरुवातीला या राड्यामागे उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय असा वाद असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र असा कोणताही वाद या मारहाणीमागे नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
तक्रारदार विद्यार्थ्याने आपल्याला अमानुष मारहाण केल्याचं म्हटलंय. मारहाण झालेल्या हिमांक नावाच्या पीडित विद्यार्थ्यानेच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत सायबराबाद पोलीस आयुक्त आणि तेलंगणाचे मंत्री केटी रामा राव यांना टॅग केलं होतं.
आपल्यासोबत घडलेल्या या प्रकाराची दखल घेत आरोपींवर शिक्षा करावी, अशी मागणी हिमांकने केली होती. दरम्यान, या शिक्षण संस्थेचे हे सर्व विद्यार्थी होते, त्या 12 विद्यार्थ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आलीय.