तुरूंगात जाईन पण घटस्फोटित पत्नीला एक छदामही देणार नाही… संतप्त पतीने कोर्टालाच सुनावलं
पती-पत्नीमध्ये वाद होणं कॉमन आहे, प्रत्येक संसारात हे कधी ना कधी तरी होतंच. पण कानपूरमध्ये विवादाचं एक अजब प्रकरण समोर आलंय. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दोघांमध्येही वाद झाल्यावर ते कायदेशीररित्या वेगळे झाले. त्यानंतर पत्नीने पतीकडे पोटगी मागितली, मात्र पैसे देण्यास पतीने नकार दिला.
कानपूर | 12 मार्च 2024 : पती-पत्नीमध्ये वाद होणं कॉमन आहे, प्रत्येक संसारात हे कधी ना कधी तरी होतंच. पण कानपूरमध्ये विवादाचं एक अजब प्रकरण समोर आलंय. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दोघांमध्येही वाद झाल्यावर ते कायदेशीररित्या वेगळे झाले. त्यानंतर पत्नीने पतीकडे पोटगी मागितली, मात्र पैसे देण्यास पतीने नकार दिला. हे पाहून त्या महिलेने कोर्टात धाव घेतली. मात्र त्यानंतरही पचीला काहीच फरक पडत नाही, तो पत्नीवर एवढा रागावलायं की कोणत्याही किमतीवर तो तिला पैसे देण्यास तयार नाही. न्यायालयाचे आदेशही त्याने नजरअंदाज केले.
पीडित पत्नीच्या म्हणण्यानुसार, तिचा पती म्हणतो की तो पाहिजे तर तुरूंगात जाईल, तिथे राहील पण बायकोला एक पैसाही देणार नाही. याप्रकरणी तो आत्तापर्यंत बरेच वेळा जेलमध्ये जाऊन आला आहे. घटस्फोटित पत्नी गेल्या 14 वर्षांपासून पोटगीसाठी लढत आहे. तिने न्यायालयातही दाद मागितली. कोर्टानेही आरोपी पतीला, त्याच्या पत्नीला पोटगीसाठी ठराविक रक्कम देण्यास सांगितले. पण त्याने कोर्टाचे आदेशही धुडकावून लावले आणि त्यासाठी तो जेलमध्येही गेला.
लग्नानंतर झाला वाद
हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील आहे. येथे राहणाऱ्या महिलेचे अनेक वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर पती-पत्नी, दोघांमध्ये वाद सुरू झाला. कौटुंबिक कलहामुळे ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. 2005 मध्ये पत्नीने तिच्या राहणीमानासाठी देखभाल भत्ता, पोटगी मागितली. मात्र पतीने तिला पैसे न दिल्याने तिने कोर्टात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून आरोपी पतीविरुद्ध 2005 साली खटला सुरू झाला. 2010 मध्ये न्यायालयाने आरोपी पतीला, त्याच्या पत्नीला मासिक देखभाल भत्ता म्हणून 1500 रुपये देण्याचे आदेश दिले.
हायकोर्टाच्या निर्णयानंतर अटक
मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर वर्षभरानंतरही पतीने, त्याच्या पत्नीला रक्कम दिली नाही, त्यामुळे पीडितेने 2011 मध्ये पुन्हा वसुलीसाठी खटला दाखल केला. न्यायालयाने आरोपी पतीला अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. पण 13 वर्षे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. यावेळी आरोपी पतीने, तुरुंगात जाणे मान्य केले, परंतु पत्नीला पैसे देण्यास नकार दिला. या अजब वादाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.