मोटारसायकलची चोरी, मोबाईल दुकानावरही दरोडा, हजारोंचा मुद्देमाल लंपास, पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?
गडमुडशिंगी येथील मोरया मोबाईल दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. त्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला (Ichalkaranji police arrest mobile thieves).
कोल्हापूर (इचलकरंजी) : राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु होता. या काळात अत्यावश्यक सेवेतील दुकानानांच ठरवीक वेळेत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं बंदच होती. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची रस्त्यावर फारशी वर्दळ नसायची. मध्यरात्री अनेक ठिकाणी रस्ते सामसूम असायचे. याच शांततेचा फायदा घेऊन इचलकरंजीत काही चोरट्यांनी मोबाईलचं दुकान फोडलं. दुकानातील मोबाईल, कम्प्युटर आणि इतर साहित्य असा एकूण 79 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेचा पोलिसांनी छळा लावला असून दोघांना अटक करण्यात आली आहे (Ichalkaranji police arrest mobile thieves).
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना ही करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे घडली. गडमुडशिंगी येथील मोरया मोबाईल दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. त्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानात असतील तेवढे मोबाईल, कम्प्युटर आणि इतर साहित्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी जवळपास 79 हजारांचा माल लंपास केला. त्यांनी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून ही चोरी केली होती (Ichalkaranji police arrest mobile thieves).
मोबाईल दुकानाच्या मालकाची पोलिसात तक्रार
दुसऱ्या दिवशी सकाळी मोरया मोबाईल दुकान चालकाला या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यांनी याबाबत माहिती मिळाली तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. आधीच लॉकडाऊन आणि त्यात दुकानात चोरी झाल्याने ते निराश झाले. त्यांनी तातडीने गांधीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली. गांधीनगर पोलिसांनी तक्रार मिळताच तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजदेखील तपासण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांकडून आरोपीस बेड्या
गांधीनगर पोलिसांनी प्रचंड मेहनत करुन अखेर संबंधित प्रकरणाचा छडा लावला. याप्रकरणी पोलिसांच्या हाती दोन संशयित आरोपी लागले. दत्तगुरु बचाराम कांबळे आणि नेहाल अबीत पाटील असं दोघांचं नाव आहे. हे दोघं आरोपी गडमुडशिंगी येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांची चौकशी करुन त्यांना अटक केलं. त्यानंतर या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. सर्व पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
चोरट्यांची मोटरसायकलही चोरीची
विशेष म्हणजे गांधीनगर पोलिसांना आरोपींकडे चोरीच्या मुद्देमालासह चोरीची एक मोटारसायकलही मिळाली. त्यांनी लॉकडाऊनचा फायदा घेऊन या सगळ्या वस्तूंची चोरी केली होती, असं उघड झालं. पोलिसांनी तातडीने आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, हेड कॉन्स्टेबल मोहन गवळी, मनोज खोत, पोलीस नाईक आकाश पाटील, आयुब शेख, संतोष कांबळे यांनी केला.
हेही वाचा : बंदुकीचा धाक दाखवून बांधकाम व्यवसायिकाचं अपहरण, जीवे मारण्याचाही प्रयत्न, भाजपच्या ZP सदस्यावर गंभीर आरोप