Ichalkaranji Accident : 50 विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसचा इचलकरंजी शाहू पुतळ्याजवळ मोठा अपघात, ट्रकच्या धडकेत 6 विद्यार्थी जखमी

Ichalkaranji News : शाहू महाराज पुतळा चौक येथे ट्रक व स्कूलबस समोरा समोर आले असता ट्रकची स्कूलला बसला धडक बसली. त्यावेळी स्कूल बस मध्ये पन्नास विद्यार्थी होते

Ichalkaranji Accident : 50 विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसचा इचलकरंजी शाहू पुतळ्याजवळ मोठा अपघात, ट्रकच्या धडकेत 6 विद्यार्थी जखमी
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 3:03 PM

इचलकरंजी : इचलकरंजी (Ichalkaranji News) शहरातील शाहू पुतळा जवळ ट्रक व स्कूल बस चा अपघात होऊन बसमधील 50 पैकी सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. इचलकरंजी (Ichalkaranji Accident News) शहरात असणाऱ्या डी के टी ई  सोसायटी येथील कलावंत मळा येथे इचलकरंजी हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज मधील पाचवी ते दहावीत  शिकणारे विद्यार्थी आज शाळा सुटल्यानंतर स्कूल बस (School Bus) मधून घरी निघाले होते. इचलकरंजी ते रुई गावातील सर्व विद्यार्थी स्कूल बस घेऊन जाते. ही स्कूल बस शाहू पुतळा मार्गे रुकडी येथे जात होती. तर ट्रक शाहू पुतळा मार्गे छत्रपती शिवतीर्थ येथे जात होता. शाहू महाराज पुतळा चौक येथे ट्रक व स्कूलबस समोरा समोर आले असता ट्रकची स्कूलला बसला धडक बसली. त्यावेळी स्कूल बस मध्ये पन्नास विद्यार्थी होते. अचानक धडक लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. बस मधील सुमारे सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर बाकीच्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे.

स्कूल बसचं अपघातात नुकसान

स्कूल बसला ट्रक जोरात धडकल्यामुळे स्कूल बसचे  मोठे नुकसान झाले. अपघात होताच नागरिकांनी स्कूल बस मधील विद्यार्थ्यांना स्कूल बस मधून बाहेर काढले व त्यांना धीर दिला. या अपघाताची माहिती पोलिसांना देतात घटनास्थळी पोलिसांनी येऊन दोन्ही वाहने ताब्यात घेतली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शिवाजीनगर पोलीसांची फोन लॅन्डलाईन बंद असल्यामुळे कोणाला फोन करायचा, असा प्रश्न नागरिकांसमोर काही वेळ उपस्थित झाला होता.

हे सुद्धा वाचा

वाढत्या अपघातांनी चिंता

दरम्यान, शहर वाहतूक शाखेचे पोलीस  घटनास्थळी आले आणि त्यांनी येऊन दोन्ही वाहने ताब्यात घेत पुढील तपास केला. शिवाजीनगर पोलिस या अपघातप्रकरणी अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपूर्वी जनता बँक चौकामध्ये असाच अपघात एसटी आणि स्कूल बस चा झाला होता. यामध्ये सुमारे पाच मुले  जखमी झाली होती. आता पुन्हा स्कूल बसचा अपघात झाल्यामुळे पालक वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ट्रक चालक व स्कूल बस वरील ड्रायव्हर यांना गडबडीत आणि निष्काळजीपणे जाण्याच्या प्रकारामुळे हे वाढते अपघात विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू लागले आहे. अशा बेजबाबदार ट्रकचालक व स्कूलबस चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक वर्गातून होऊ लागली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.