बनावट कागदपत्रांद्वारे ‘या’ बँकेला 63 लाखांचा गंडा, तरुणी टोळीची मास्टरमाईंड

गृहकर्जासाठी एका महिलेने आयडीबीआय बँकेत एजंटमार्फत अर्ज केला. बँकेने अर्ज मंजूरही केला. यानंतर कर्जाचे पैसेही विक्रेत्या ग्राहकाच्या खात्यात जमा झाले. मात्र एका सर्टिफिकेटसाठी बँकेने एक फोन केला आणि अधिकारी हैराण झाले.

बनावट कागदपत्रांद्वारे 'या' बँकेला 63 लाखांचा गंडा, तरुणी टोळीची मास्टरमाईंड
बदलापूरमध्ये गृकर्जाद्वारे बँकेला लाखोंचा गंडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 3:48 PM

बदलापूर / निनाद करमरकर : अंबरनाथमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे गृहकर्ज घेत आयडीबीआय बँकेला 63 लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सात जणांच्या टोळीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक 26 वर्षांची तरुणी ही या टोळीची मास्टरमाईंड आहे. अटक आरोपींमध्ये बनावट अकाऊंट उघडणाऱ्या बँक कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. या सातही आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून पोलिसांनी अपहार झालेल्या रकमेपैकी जवळपास 43 लाख रुपयांचं सोनं आणि 9 मोबाईल हस्तगत केले आहेत. आरोपींकडून अशाच प्रकारच्या फसवणुकीचे आणखी दोन गुन्हे उघडकीस येत असून, त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

नवी मुंबईला राहणाऱ्या दिशा पोटे यांना कामोठे इथल्या जयंत बंडोपाध्याय यांचं घर खरेदी करायचं होतं. त्यासाठी त्यांच्याच तोंडओळखीच्या रसिका नाईक, रमाकांत नाईक आणि मंदार नाईक यांनी कर्ज मिळवून देण्याचं आश्वासन देत, त्यांच्याकडून त्यांची आणि बंडोपाध्याय यांची कागदपत्रं घेतली. त्यानंतर अंबरनाथच्या आयडीबीआय बँकेत दिशा पोटे यांच्या नावाने गृहकर्जासाठी अर्ज करण्यात आला.

दुसरीकडे ज्यांच्या खात्यात ही कर्जाची रक्कम जमा होणार होती, त्या बंडोपाध्याय यांच्या नावाने मात्र एक बनावट अकाउंट नवी मुंबईच्या आयसीआयसीआय बँकेत उघडण्यात आलं. इकडे आयडीबीआय बँकेनं दिशा पोटे यांची कागदपत्रं तपासून त्यांचं कर्ज मंजूर केलं आणि कर्जाची रक्कम ही थेट बंडोपाध्याय यांच्या बनावट अकाउंटमध्ये वर्ग झाली. यानंतर सिडकोच्या एनओसीसाठी बँकेनं पोटे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्यानं बँकेनं बंडोपाध्याय यांच्याशी संपर्क साधला.

हे सुद्धा वाचा

‘असा’ उघड झाला गुन्हा

यावेळी बंडोपाध्याय यांनी आपलं घर विकायचं आहे हे जरी खरं असलं, तरी आपल्याला अद्याप कर्जाचे पैसे मिळालेले नसून, आपलं आयसीआयसीआय बँकेत अकाउंटसुद्धा नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं चक्रावलेल्या आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी आयसीआयसीआय बँकेत धाव घेत तिथले रेकॉर्ड तपासले असता तिथे नाव बंडोपाध्याय यांचं, मात्र फोटो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं समोर आलं.

यानंतर हा सगळा फसवणुकीचा प्रकार असल्याचं लक्षात येताच आयडीबीआय बँकेनं अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुहास पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी नवी मुंबईच्या शब्बीर सय्यद मोहम्मद पटेल या बनावट कागदपत्रं तयार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडलं.

पटेलच्या चौकशीतून रसिका नाईक, मंदार नाईक आणि रमाकांत नाईक यांचा सुगावा लागताच या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. तसेच बनावट कागदपत्रं बनवून देणारे कुणाल नानजी जोगडीया आणि किशोर प्रवीण जैन या दोघांनाही अटक करण्यात आली. तर सर्वात शेवटी बंडोपाध्याय म्हणून अकाउंट उघडणाऱ्या राजेंद्र वामन शेट्टी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

ज्यांच्या नावावर कर्ज घेण्यात आलं, त्या दिशा पोटे यांचाही या गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश करण्यात आलाय. मात्र त्यांचा खरोखरच या गुन्ह्यात सहभाग आहे का? त्यांना फसवणुकीची माहिती होती का? या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू असून त्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.