मोबाईल चोरीला गेल्यास अजिबात टेंशन घेऊ नका, ‘ही’ प्रक्रिया केल्यास मोबाईल मिळेल परत…
सूचना पत्रकात नागरिकांसाठी क्रमवारीत सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 07 सूचना आहेत. त्याचे पालन योग्य पद्धतीने केल्यास मोबाईल मिळण्याची शक्यता जास्त आहे.
नाशिक : मोबाईल (Mobile) चोरीला जाणे ही बाब आत्ताच्या काळात किरकोळ वाटत असली तरी ज्या व्यक्तीचा मोबाईल चोरीला जातो त्याच व्यक्तीला मोबाईल चोरीला गेल्याची किंमत कळत असते. मोबाईल चोरीच्या किंवा हरवण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता तो परत मिळवून देण्यासाठी त्यावर आता तोडगा काढण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस दल (Maharashtra Police) आणि केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाचा (MINISTRY OF COMMUNICATIONS) देखील उल्लेख आहे. त्यामध्ये मोबाईल / चोरीला झाल्यास तो परत मिळू शकतो. त्यासाठी शासनाने CEIR ( Central Equipment Identity Register) पोर्टलची निर्मिती केली आहे. तरी नागरिकांनी काय करावे ? अशा शीर्षकाखाली सूचना वजा माहितीपत्रक काढले आहे.
सूचना पत्रकात नागरिकांसाठी क्रमवारीत सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 07 सूचना आहेत. त्याचे पालन योग्य पद्धतीने केल्यास मोबाईल मिळण्याची शक्यता जास्त आहे.
1) जवळील पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी.
2) जे सिमकार्ड चालू आहे ते ब्लॉक करावे व त्याच नंबरचे दुसरे सुरू करून घ्यावे व तेच सिमकार्ड CEIR वर रजिस्ट्रेशन करिता वापरावे.
3) https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या वेबसाईटवर संपर्क साधावा.
4) Block Stolen / Lost Mobile यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी व Submit वर क्लिक करावे.
5) खालील कागदपत्रे सोबत जोडावी – (सॉफ्टकॉपीची साईज 500 kb पेक्षा कमी असावी.) पोलीस स्टेशनला केलेली तक्रार प्रत मोबाईल खरेदी बिल कोणतेही शासकीय ओळखपत्र
6) यावर आपल्याला तक्रार नोंदविल्याचा Request Number मिळेल.
7) हरवलेला मोबाईल Active/On झाल्याची माहिती पोर्टलद्वारे रजिस्टर मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे मिळेल व सदरची माहिती पोलीस स्टेशन येथे कळवावी.
या वरील सात सूचनामध्ये सर्वाधिक महत्वाचे म्हणजे तुम्ही मोबाईल खरेदी केल्यानंतर त्याचे बिल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. इतर बाबी मात्र मोबाईल चोरी किंवा हरवल्यानंतर देखील उपलब्ध करता येऊ शकतील.
त्यामुळे मोबाईल चोरीला अथवा हरवला गेलास त्यांच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बाब आहे. कारण मोबाईल चोरीला अथवा हरवल्यास त्यातील संपर्क क्रमांक, महत्वाचा डाटा जात असतो.