मुंबई : उच्च न्यायालयाने (High Court) एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. हा निकाल देताना न्यायलयानं नोंदवलेलं मत सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार ठरलंय. नवरा बायकोतील (Husand Wife Clash) भांडणं काही नवी नाहीत. पण नवऱ्याला घराबाहेर काढल्यानंतर जर घरात शांतता नांदत असेल, तर तसे आदेश द्यायला हवेत, असं मत उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. मद्रास हायकोर्टाने नोंदवलेलं हे मत सध्या चर्चेत आलं आहे. पतीकडे दुसऱ्या राहायवी व्यवस्था असो किंवा नसो, पर्याय व्यवस्थेची काळजी न करात पतीला घराबाहेर काढले पाहिजे, अशा शब्दांत मद्रास हायकोर्टानं (Madras High court) सुनावलंय. बार एन्ड बेन्च वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, एका कौतुक हिंसाचार प्रकरणाच्या खटल्यावर भाष्य करताना कोर्टानं ही टिप्पणी केली आहे. एखादा पती जर आपल्या पतीला फक्त गृहिणी म्हणून ठेवू इच्छित असेल तर त्या महिलेचं आयुष्य अत्यंत दयनीय होऊन जाईल, अशीही टिप्पणी कोर्टाने केलीय.
मद्रास हायकोर्टात एक खटला सुरु होता. एका महिलेनं जिल्हा न्यायालयात एक याचिका केली होती. वारंवार पती आपला अपमान करतो, म्हणून पतीला घर सोडण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी महिलेनं केली होती. पण या महिलेची मागणी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली होती. हे दाम्पत्य ज्या घरात राहत होतं, ते घर पती-पत्नी दोघांच्या मालकीचं होतं. जिल्हा न्यायालयाने पत्नीची मागणी फेटाळल्यानंतरही तिने हार मानली नाही. पीडित पत्नीने वरच्या न्यायालयात जाण्याच्या निर्णय घेतला.
अखेर पत्नीने मद्रास हायकोर्टात जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान दिलं. पतीची नेहमी असणार नकारात्मक भूमिका आणि आपल्यासोबत असलेले गैरवर्तन यामुळे घरात नेहमी तणाव असल्याचा युक्तिवाद पीडित पत्नीच्या वतीने करण्यात आला. दर दुसरीकडे पतीने आपली बाजू मांडण्यासाठी युक्तिवाद केला. आदर्श माता फक्त मुलांचा सांभाळ करु शकते आणि घरची कामं करते, असं पतीचं म्हणणं होतं. पण पतीचा हा युक्तिवाद कोर्टाने अमान्य केला आणि त्यावर टीकाही केली.
इतकंच काय तर घरात भीतीच्या छायेमध्ये राहणाऱ्या महिलांबाबत न्यायालयाने उदासीन भूमिका घेऊ नये, असंही मद्रास हायकोर्टातील न्यायमूर्ती आर.एन.मंजुला यांनी म्हटलंय.. घरात शांतता नांदण्यासाठी जर पतीला घराबाहेर काढणं हा एकमेव मार्ग असेल, तर तसे आदेश कोर्टाने दिले पाहिजे, असंही कोर्टानं स्पष्टपणे नमूद केलंय.