ही घटना वाचली तर तुमचं मन तुम्हाला नक्की सांगेल, ही वेळ कुणावरच नको, रस्त्यावर सुसाट गाडी चालवणार तर..
वाहने वेगाने चालविल्याने अनेक जणांचे बळी जात आहेत, भारतात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रस्ते अपघातात सर्वाधिक बळी जात आहेत. राजस्थानच्या जयपूरची ही घटना अशीच भीषण आहे.
जयपूर : येथील अलवरच्या कठूमर परिसरात एका रस्ते अपघातात बाजरीचे भारे घेऊन जाणाऱ्या एका ट्रॉली ट्रेलर चालकाने पोलिसी कारवाईच्या भीतीने वेगाने ट्रेलर चालविल्याने भीषण अपघात घडला आहे. ट्रॉली ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोला जबरधडक बसून टेम्पो उलटून एकाच कुटुंबातील बाप आणि तीन लहान मुले असे चार सदस्य जागीच ठार तर आई जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेनंतर ट्रॉली चालक पळून गेला तर जमावाने ट्रॉली पेटवून मृतदेहच ताब्यात न घेता निर्दशने केल्याने खळबळ उडाली होती.
सुण्डयाणाचे रहिवासीचे मुरारी सिंह ( वय 45 ) आपल्या आजारी मुलाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी निघाले तर त्याच्या इतर दोन मुलांनी फिरून येऊ म्हणून सोबत येण्याची जिद्द केली तर आई देखील मुलांसोबत आली. दवाखान्यात हे आई-वडील आणि तीन मुले घरे येत असताना हा भीषण अपघात घडला. बाजरीच्या पिकांनी खच्चून भरलेल्या चार ट्रॉली ट्रेलर रस्त्याने वेगाने चालल्या होत्या तर हे कुटुंब टेम्पोने घरी परतत होते. पोलीसी कारवाईच्या भितीने ट्रॉली चालक वेगाने चालले होते. तीन ट्ऱॉली ट्रेलर व्यवस्थित पास झाले. परंतू चौथ्या ट्रॉलीची जबर धडक टेम्पोला बसली. आणि टेम्पोत बसलेल्या पाच जणांपैकी चार जणांचा मदत मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला. मुरार सिंह राय यांचा तसेच त्यांची मुलगी कृष्णा (वय 14 ), मुलगा नितेश ( वय 12 ) आणि दुसरा मुलगा गौरव ( वय 10 ) यांचा मृत्यू झाला. तर मुरार यांची पत्नी लाडाबाई यांनी जखमी अवस्थे दवाखान्यात दाखल केले आहे.
मोठ्या बहिणीचे पंधरा दिवसांनी लग्न
या दुर्देवी घटनेत सहा सदस्यांच्या या कुटुंबातील तीन लहान भावांना गमावणाऱ्या सर्वात मोठ्या बहीणीचे पंधरा दिवसाने लग्न आहे. रडून रडून तिची अवस्था बिकट झाली आहे. आई रूग्णालयात पतीचे एकदा तोंड दाखवा म्हणत या सगळ्या घटनाक्रमापासून अनभिज्ञ आहे. या घटनेनंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून मारहाणीच्या भीतीने पळ काढला. तर जमावाने ट्ऱॉली पेटवून मृतदेह ताब्यात न घेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या जीपवर दगडफेक केली. अखेर स्थानिक प्रशासनाने योग्य नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याने रात्री उशीरा तीन वाजल्यानंतर चितांनी अग्नि देण्यात कसेबसे यश आले.