Navi Mumbai Crime : नवी मुंबईत अवैध गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, एपीएमसी पोलिसांकडून दोन आरोपींना अटक

आरोपी सलमान हा MH 43 या हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत अवैध गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, एपीएमसी पोलिसांकडून दोन आरोपींना अटक
नवी मुंबईत अवैध गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्तImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 1:37 AM

नवी मुंबई : नवी मुंबईतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीं (Accused)ना पकडण्यास एपीएमसी पोलिसांना यश आले असून, आरोपींकडून गावठी पिस्तुल (Pistol)सह जिवंत काडतुसे (Cartridge) जप्त करण्यात आली आहेत. सलमान कलदाणी (24) आणि जितेंद्रसिंग भदोरीया (26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सलमान हा MH 43 या हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केले

नवी मुंबईतील कोपरी गावात एका भरधाव वेगातील स्विफ्ट कारने फुटपाथवरुन चाललेल्या 80 वर्षीय वृद्धाला धडक दिली होती. या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला होता. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते. या प्रकरणातील फरार आरोपी MH 43 या हॉटेलमध्ये येणार असल्याची गु्प्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या हॉटेलच्या परिसरात सापळा रचला. यावेळी एक संशयास्पद कार हॉटेलजवळ फिरताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी ही कार ताब्यात घेत तपासणी केली असता आत फरार आरोपी सलमान कलदाणी आणि त्याचा साथीदार जितेंद्रसिंग भदोरिया आढळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कारची झडती घेतली असता कारमध्ये एक देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळले. याप्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे अधिक तपास करत आहेत. (Illegal village pistol along with live cartridges seized in Navi Mumbai, two accused arrested)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.