पती-पत्नीमधला वाद घटस्फोटापर्यंत पोहचला, मात्र पतीला एक संधी हवी होती, पण सासू मध्ये येत होती, शेवटी…

पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद घटस्फोटापर्यंत पोहचला. पतीला वाद मिटवून पुन्हा संसार करायचा होता. पण सासू मध्ये अडथळा ठरत होती.

पती-पत्नीमधला वाद घटस्फोटापर्यंत पोहचला, मात्र पतीला एक संधी हवी होती, पण सासू मध्ये येत होती, शेवटी...
जमिनीच्या वादातून पुतण्याने काकाला संपवले
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 7:21 PM

विजयवाडा : आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीच्या नात्यात अडथळा ठरणाऱ्या सासूचा जावयाने काटा काढल्याची घटना उघडकीस आली आहे. सासू आरोपीच्या पत्नीला वारंवार घटस्फोट घेण्यासाठी भडकावत असल्याने जावयाने टोकाचे पाऊल उचलले. राजेश असे आरोपीचे नाव असून, तो फरार झाला आहे. राजेशने विजयवाडा परिसरातील एका उड्डाणपुलावर शनिवारी रात्री सासूबाईची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. चनुमोलू वेंकट राव उड्डाण पुलावर ही घटना घडली असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपी राजेश हा घरोघरी कपड्यांची विक्री करत होता. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती विजयवाडा पोलिसांनी दिली.

क्षुल्लक वाद घटस्फोटापर्यंत गेला

आरोपी राजेश आणि त्याच्या पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचले. कुटुंब न्यायालयामध्ये घटस्फोटाची याचिका प्रलंबित आहे. दोघांमधील वाद पुन्हा सामोपचाराने मिटवला जाऊ शकतो, अशी शक्यता दिसत आहे. मात्र राजेशची सासू आपल्या मुलीला घटस्फोट घेण्यास प्रवृत्त करत होती. पती-पत्नीतील वाद मिटवण्याऐवजी सासू दोघांच्या वाद घटस्फोटापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याने राजेशला आपला संताप अनावर झाला.

पत्नीला घटस्फोटासाठी भडकावत असल्याने सासूला संपवले

घटस्फोटातून पत्नीने माघार घेऊन पुन्हा संसार करावा, असे राजेशला मनोमन वाटत होते. त्यामुळे पत्नीला घटस्फोटासाठी भडकावणाऱ्या सासूबद्दल राजेशच्या मनात तीव्र चीड निर्माण झाली होती. याच रागातून राजेशने 47 वर्षीय नागमणी यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. विजयवाडा शहरातील चनुमोलू वेंकट राव उड्डाणपुलावर ही धक्कादायक घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

सासूवर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर आरोपी राजेशने घटनास्थळावरून पळ काढला. राजेशच्या हल्ल्यामध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे नागमणी या उड्डाणपुलावर रक्तबंबाळ अवस्थेत पडल्या होत्या. मात्र काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.