Aurangabad : औरंगाबादमध्ये पोटच्या मुलीवर बापाने केला तब्बल अकरा वर्षे अत्याचार, पीडीतेची कहाणी ऐकून पोलिस चक्रावले
Aurangabad Police : सतरा वर्षीय तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करायला सुरूवात केली. परभणी जिल्ह्यात मुलगी असल्याची माहिती औरंगाबादमधील मुकुंदवाडी पोलिसांना माहिती मिळाली.
औरंगाबाद – औरंगाबादमध्ये (Aurangabad) पोटच्या मुलीवर बापाने केला तब्बल अकरा वर्षे अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अकरा वर्षे अत्याचार करणारा मनोविकृत बाप पोलिसांनी (Aurangabad Police) ताब्यात घेतला आहे. बालवयात होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून मुलीने घर सोडले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. वारंवार बापाकडून अत्याचार होत असल्याने अल्पवयीन तरूणी घर सोडून अंबेजोगाईला (Ambajogai) गेली होती. अकरा वर्ष मुलीवर होणारा अत्याचार ऐकताच पुंडलिकनगर पोलीस कर्मचारी स्तब्ध झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी बापाने पुन्हा अत्याचार केल्याने मुलीने घरातून जाण्याचा निर्णय घेतला.
वडिल अत्याचार करीत असल्याचे सांगितले
सतरा वर्षीय तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करायला सुरूवात केली. परभणी जिल्ह्यात मुलगी असल्याची माहिती औरंगाबादमधील मुकुंदवाडी पोलिसांना माहिती मिळाली. त्यावेळी तिथल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी तिला जवळ घेऊन विचारपूस केली. त्यावेळी तरूणीने वडिल अत्याचार करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे मी घर सोडण्याचा निर्णय घेतला असं मुलीने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तिच्या तोंडून हे शब्द ऐकताच तातडीने पोलिसांनी विकृत बापाला ताब्यात घेतले आहे.
कहाणी ऐकून पोलिस चक्रावले
संबंधित मुलगी सहा वर्षाची असल्यापासून बाप तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. मुलीने तब्बल अकरा वर्षे हा अत्याचार निमुटपणे सहन केला. मागच्या दीड महिन्यापुर्वी मुलीवरती पुन्हा बलात्कार केला, त्यामुळे मुलीने परभणी येथील एका मित्राकडे पळ काढला होता. अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे. संबंधित मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. संबंधित प्रकरण औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलिस ठाणे हद्दीतील आहे. आत्तापर्यंत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. तसेच अश्या गुन्हातून आरोपींना शिक्षा देखील सुनावली आहे. तरीही अशा घटना उजेडात येत आहेत.