घराजवळ दारू पिण्यास मज्जाव केला, दोन सख्या भावांना टोळक्याची मारहाण

याप्रकरणी पोलिसांनी गणेश यांच्या जबानीवरून मारहाण करणारे राजेश आणि त्याचे अन्य चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात जबर दुखापत पोहोचवणे आणि मारहाणीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

घराजवळ दारू पिण्यास मज्जाव केला, दोन सख्या भावांना टोळक्याची मारहाण
बदलापूरमध्ये किरकोळ वादातून दोन भावांना मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 6:51 PM

बदलापूर : घराजवळ बसून दारू पीत असताना हटकल्याच्या रागातून टोळक्याने दोन भावांना मारहाण केल्याची घटना बदलापूर गावात घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. मारहाणीत एकाला जबर मारहाण केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारा सुरु आहेत.

बदलापूर गावात घडली घटना

बदलापूर गावात गणेश सकपाळ हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्याला आहेत. 8 नोव्हेंबर रोजी योगेश सोनवणे आणि अन्य काही जण गणेश यांच्या घराजवळ दारू पिण्यासाठी बसले होते. त्यामुळे गणेश यांनी त्यांना हटकत इथे दारू प्यायला बसू नका, असं सांगितलं.

दारु पिण्यास मनाई केली म्हणून मारहाण

यावरून गणेश आणि त्या टोळक्यामध्ये शाब्दिक वाद झाले. यानंतर दारू पिण्यास बसलेले टोळके तेथून निघून गेले. मात्र काही वेळाने राजेश आणि अन्य चार ते पाच जण पुन्हा तेथे आले.

हे सुद्धा वाचा

या टोळक्याने गणेश सकपाळ यांच्या मोठ्या भावाला लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली. त्यामुळे गणेश हे त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडले असता या चार ते पाच जणांच्या टोळक्याने गणेश यांना बेदम मारहाण केली.

मारहाणीत गणेश यांना गंभीर इजा

या मारहाणीत गणेश यांच्या डोक्याला आणि इतरत्र इजा झाली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी गणेश यांच्या जबानीवरून मारहाण करणारे राजेश आणि त्याचे अन्य चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात जबर दुखापत पोहोचवणे आणि मारहाणीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या सर्वांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.