पहिला पती सोडून दुसरा केला, मात्र घरखर्चाचेही वांदे झाले; नैराश्येतून घेतला टोकाचा निर्णय, पण…

रिवा जिल्ह्यात राहणाऱ्या या महिलेचे पहिल्या पतीसोबत नेहमी भांडण व्हायचे, म्हणून तिने त्याला सोडले. त्यानंतर बांदामध्ये राहणाऱ्या तरुणासोबत महिलेचे प्रेमसंबंध जुळले. दीड वर्षापूर्वी दोघांनी लग्न केले.

पहिला पती सोडून दुसरा केला, मात्र घरखर्चाचेही वांदे झाले; नैराश्येतून घेतला टोकाचा निर्णय, पण...
नवजात बालिकेला मातेने कचऱ्यात फेकलेImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 2:51 PM

बांदा : पहिल्या पतीला सोडून दुसऱ्यासोबत प्रेमविवाह केला. मात्र दुसरा पतीही मारहाण आणि भांडण करत असल्याने कंटाळलेल्या महिलेने स्वतःच्या तीन महिन्यांच्या मुलीला ट्रेनमधून फेकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांदामध्ये उघडकीस आली आहे. सुदैवाने एका तरुणाच्या सतर्कतेमुळे मुलीला वाचवण्यात यश आले. यानंतर सदर तरुणाने मुलीची जबाबदारी स्विकारली. मात्र मुलीला बसमधून घेऊन जात असताना एका प्रवाशाला त्याच्यावर संशय आला आणि अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले.

काय आहे नेमके प्रकरण?

रिवा जिल्ह्यात राहणाऱ्या या महिलेचे पहिल्या पतीसोबत नेहमी भांडण व्हायचे, म्हणून तिने त्याला सोडले. त्यानंतर बांदामध्ये राहणाऱ्या तरुणासोबत महिलेचे प्रेमसंबंध जुळले. दीड वर्षापूर्वी दोघांनी लग्न केले. दोघांना एक तीन महिन्यांची मुलगीही आहे.

दुसरा पतीही महिलेशी रोज भांडण आणि मारहाण करायचा. तिला घरखर्चाचे पैसेही देत नव्हता. त्यामुळे मुलीचे पालनपोषण करणे महिलेला अवघड झाले होते. यामुळे तिने मुलीला चालत्या ट्रेनमधून फेकण्याचा किंवा कुठेतरी नेऊन सोडण्याचा विचार केला.

हे सुद्धा वाचा

एका तरुणाचे महिलेकडे लक्ष गेले अन्…

महिला संपूर्ण प्लानिंगनुसार बांदा येथून ट्रेनमध्ये चढली. यावेळी एका तरुणाची तिच्याकडे नजर गेली. तिच्याकडे पाहून ती तणावात असल्याचे जाणवले म्हणून तरुणाने तिची विचारपूस केली.

यावेळी महिलेने तरुणाला आपली सर्व कहाणी सांगितली आणि मुलीसोबत काय करण्याचा प्लान आहे ते ही सांगितले. हे ऐकून तरुणाच्या अंगावर काटाच उभा राहिला. त्यानंतर त्याने मुलीला स्वतःकडे ठेवून घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि महिलेनेही ते मान्य केले.

तरुणाने मुलीला घेतले पण एका प्रवाशामुळे प्रकरण पोलिसात गेले

तरुणाने महिलेची संपूर्ण डिटेल लिहून घेत मुलीला आपल्याकडे ठेवून घेतले. मुलीला देऊन महिला निघून गेली. त्यानंतर तरुण मुलीला घेऊन बसने चालला होता. यावेळी बसमधील एका प्रवाशाला त्याच्यावर संशय आल्याने त्याने त्वरीत ही माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी मुलीला आईच्या स्वाधीन केले

पोलिसांनी तात्काळ तरुणाला पकडले आणि त्याची चौकशी केली. तरुणाने महिलेने सांगितलेली सर्व कहाणी पोलिसांना सांगितली. हे ऐकून पोलीसही चक्रावले. सदर मुलगी आजारी असल्याने पोलिसांनी आधी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिच्या आईचा शोध घेतला आणि मुलीला तिच्याकडे सोपवले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.