पत्नीने दुसऱ्या पुरुषाशी संसार थाटला, मग पतीला संताप अनावर झाला अन्…

रोजच्या वादाला कंटाळून पत्नी पतीला सोडून गेली. त्यानंतर तिने दुसऱ्यासोबत संसार थाटला. मात्र सहा वर्षे उलटली तरी पतीच्या मनातून ही खदखद जात नव्हती. अखेर त्याने काटा काढायचे ठरवलेच.

पत्नीने दुसऱ्या पुरुषाशी संसार थाटला, मग पतीला संताप अनावर झाला अन्...
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 9:20 PM

बंगळुरु : दररोजच्या वादाला कंटाळून पत्नी पतीला सोडून दुसऱ्याशी संसार थाटला. मात्र पत्नीचे हे कृत्य मनाला न रुचल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने तब्बल सहा वर्षानंतर पत्नीचा बदला घेतला. त्याने दारूच्या नशेत विभक्त पत्नीचे घर गाठले आणि तिची निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर तिच्या अडीच वर्षाच्या मुलावर चाकूने सपासप वार केले. कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील हेनूर पीएस परिसरात ही भयंकर घटना घडली आहे. आरोपी पतीने दारूच्या नशेत विभक्त पत्नीसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अखेर हे भांडण टोकाला जाऊन आरोपी पतीने तिची हत्या केली. त्यानंतर अडीच वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. शेख सोहेल असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सहा वर्षांपूर्वी पत्नी सोडून गेली

तबसेनबेबी असे हत्या झालेल्या 32 वर्षीय महिलेचे नाव आहे. तबसेनबेबी हिचे आरोपी सोहेल याच्यासोबत 2013 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर काही कालावधीतच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. अखेर सहा वर्षांपूर्वी तबसेनबेबी हिने सोहेलची साथ सोडली आणि ती परपुरुषासोबत पळून गेली. पत्नीने अर्ध्यावर संसार सोडल्यामुळे संतापलेल्या सोहेलने दारूचे व्यसन सुरू ठेवले. याच दरम्यान त्याने पत्नीला धडा शिकवण्याचा प्लान आखला.

दारुच्या नशेत पत्नीला संपवले

सहा वर्षांपूर्वी झालेल्या मतभेदाचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्याच्या हेतूने सोहेल याने तबसेनबेबी ही सध्या ज्या ठिकाणी राहते, त्या घरात धाव घेतली होती. तिथे जाऊन त्याने दारूच्या नशेत तबसेनबेबी हिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. याच वादात सोहेलने पत्नीचा खून केला.

हे सुद्धा वाचा

स्थानिक पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी सोहेल याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली जात आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नाही. मात्र दोघांमधील बिनसलेले वैवाहिक संबंध हेच कारण असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.