इंश्योरन्स कंपनीच्या मॅनेजर नेहाचा मृतदेह बंद फ्लॅटमध्ये अर्धनग्न अवस्थेत सापडला, काय नेमके प्रकरण ?

नेहाची आई तिला मोबाईल फोनवर कॉल करीत होती. परंतू ती फोन उचलत नव्हती. नेहाच्या आईने त्याच इमारती खाली राहणाऱ्या घरमालकाला याबाबत कल्पना दिली. घरमालक नेहाच्या फ्लॅटमध्ये गेला तर दरवाजा आतून बंद होता.खूप वेळ दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळाला नाही.

इंश्योरन्स कंपनीच्या मॅनेजर नेहाचा मृतदेह बंद फ्लॅटमध्ये अर्धनग्न अवस्थेत सापडला, काय नेमके प्रकरण ?
neha vijayvargiy
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 5:54 PM

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या अवधपुरी परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमधून इश्योरन्स कंपनीच्या महिला मॅनेजर नेहा हीच मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडली आहे. या महिलेचा मृतदेह तिच्या राजगढ या गावी नेण्यात आला असून त्याच्यावर तिच्या नातेवाईकांनी अंत्य संस्कार देखील केले आहे. भोपाळ पोलिसांना पोस्टमार्टेमनंतर नेहाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे सोपवला होता. आता पोलिसांचे लक्ष पोस्टमार्टेमचा अहवाल काय येतो याकडे लागले आहे. म्हणजे नेहाच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. कारण तिचा मृतदेह संशयास्पद रित्या सापडला होता.

अवधपुरी येथील निर्मल पॅलेस येथील एका घरात नेहा विजयवर्गीय ( 36) दुसऱ्या मजल्यावर रहात होती. नेहा नर्मदापुरम रोड येथे असलेल्या एका खाजगी इंश्योरन्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होती. ती गेल्या सात ते आठ महिन्यांपासून या फ्लॅटमध्ये भाड्याने रहात होती.

22 ऑक्टोबर रोजी नेहाची आई तिला कॉल करीत होती. परंतू नेहा फोन उचलत नव्हती. नेहाच्या आईने तिच्या फ्लॅटच्या खाली रहाणाऱ्या घरमालकाला यांसंदर्भात सांगत चौकशी करायला सांगितले. जेव्हा घरमालक नेहाच्या फ्लॅटजवळ गेला तेव्हा त्याला फ्लॅटचा दरवाजा आतून लॉक असलेला आढळला. त्याने बराच वेळ दरवाजा वाजवला आणि आवाज देऊन पाहीला मात्र दरवाजा काही केल्या उघडला गेला नसल्याचे त्याने अवधपुरी पोलिसांना या बाबत तक्रार केली. जेव्हा पोलिसांची टीम तेथे दाखल झाली. तेव्हा दरवाजा तोडण्यात आला.

नेहा अर्धनग्नावस्थेत निपचित पडली होती

तेव्हा नेहा पलंगाच्या खाली अर्धनग्नावस्थे पडलेली आढळली. नेहाच्या तोंडातून फेस आलेला होता. उलटी देखील झालेली दिसत होती. तिने विष खाऊन आत्महत्या केलेली असावी असा संशय आहे.परंतू फ्लॅटच्या आत कोणतीही बाटली किंवा विषारी पदार्थाचा रॅपर किंवा पाकिट सापडलेले नाही किंवा कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.त्यामुळे या प्रकरणात संशय वाढलेला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा माग काढण्यासाठी तपास सुरु केला आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टेम करुन नातेवाईकांकडे सोपवले आहे. सध्या पोलिस पोस्टमार्टेमच्या अहवालाची वाट पाहात आहेत. त्यानंतरच तपासाला योग्य दिशा मिळू शकणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.