मेव्हणीवर भावोजीचा जीव जडला, पण…; मग त्याने जे केले ते पाहून सर्वच हादरले !

भावोजी आणि मेव्हणीमध्ये सूत जुळले. पण बहिण प्रेमात अडथळा ठरत होती. मग त्यांनी जे केले त्यानंतर थेट तुरुंगातच पोहचले.

मेव्हणीवर भावोजीचा जीव जडला, पण...; मग त्याने जे केले ते पाहून सर्वच हादरले !
कर्ज फेडण्यासाठी पिझ्झा शॉपमध्ये चोरी
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 8:26 AM

लखीसराय : मेव्हणी आणि भावोजीमध्ये अनैतिक प्रेमसंबंध जडले होते. पण पत्नी या प्रेमसंबंधात अडथळा ठरत होती. म्हणून पतीने जे केले ते पाहून सर्वच हादरले. पत्नी झोपेत असताना पतीने तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केली. बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पती, मेव्हणी आणि मुलगा या तिघांना अटक केली आहे. घटनेच्या चार तासाच्या आत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली. राजेंद्र मंडल, सुमन भारती आणि सौरव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला देशी कट्टा आणि खोकाही जप्त केला आहे.

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने हत्या

मयत सुधाश्री मंडल ही मुंगेरच्या धरहरा येथे एएनएमच्या पदावर कार्यरत होती. तिचा पती राजेंद्र मंडल आणि बहिण सुमन भारती यांच्यात अनैतिक संबंध होते. या संबंधाला सुधाश्रीचा विरोध होता. यामुळे सुधाश्रीला आपल्या मार्गातून दीर करण्यासाठी पती, बहिण आणि मुलाने तिच्या हत्येचा कट रचला. पती रात्री गाढ झोपेत असताना पहाटे तिच्यावर गोळी झाडली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती मुलगा सौरवच्या नावे करण्यात येणार होती.

पोलीस चौकशीत आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

कजरा पोलिसांना पहाटे 3 वाजता राजेंद्र मंडलच्या घरी गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहिले असता घरात सुधाश्रीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घरी उपस्थित पती, बहिण आणि मुलाची कसून चौकशी केली असता घटना उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.