मामाला नात्याचाच विसर पडला, क्षुल्लक कारणातून भाच्यासोबत जे केले ते भयंकर !

बिहारमध्ये क्षुल्लक कारणातून नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वच हादरले. मामा आणि भाच्याच नातंच वेगळं असतं. पण याच नात्याला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे.

मामाला नात्याचाच विसर पडला, क्षुल्लक कारणातून भाच्यासोबत जे केले ते भयंकर !
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 6:23 PM

गोपालगंज : मामा भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. पाचशे रुपयांच्या वादातून मामानेच भाच्याचा काटा काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्यात मयत तरुणाच्या मित्राने आरोपीची मदत केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार, मोबाईल, मोटारसायकल, चप्पल पोलिसांनी हस्तगत केले आहे. मेघु महतो असे आरोपी मामाचे नाव आहे, तर अनिल महतो असे मयत भाच्याचे नाव आहे. दोघेही मामा-भाचा पेंटरचे काम करत होते. अनिलची हत्या केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात गुन्ह्याचा छडा लावला.

पाचशे रुपयांवरुन दोघांचा वाद झाला

घटनेच्या दिवशी दोघे जण कामावरुन घरी परतत होते. यावेळी श्यामपूरजवळ बाईकमध्ये 500 रुपयांचे पेट्रोल भरण्यावरुन वाद झाला. यानंतर दोघे जण घरी आले. घरी आल्यानंतर मेघु महतोने आपल्या अन्य साथीदाराच्या मदतीने अनिलची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला. याप्रकरणी अनिलच्या पत्नीच्या जबाबावरुन गुन्हा नोंद करत पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला.

घटनास्थळावर सापडलेल्या चपलांमुळे आरोपी पकडले

पोलिसांनी घटनास्थळाचा तपास केला असता रक्ताने माखलेल्या दोन जोडी चपला आणि चाकू सापडला. पोलिसांनी अधिक तपास केला असता या चपला मेघु आणि त्याच्या साथीदाराच्या असल्याचे निष्पन्न झाले. याच आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहचले. पोलिसांनी आरोपीला अटक करत चौकशी केली असता, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

हे सुद्धा वाचा

प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केले म्हणून प्रियकराने घडवला स्फोट

प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केले म्हणून तिला अद्दल घडवण्यासाठी प्रियकराने जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रियकराने एक म्युझिक सिस्टम खरेदी केली. त्यात स्फोटक पदार्थ भरुन प्रेयसीला लग्नात गिफ्ट दिला. लग्नानंतर प्रेयसीच्या सासरच्यांनी म्युझिक सिस्टम चालू करताच त्याचा स्फोट झाला. या स्फोटात नवरदेवासह त्याच्या भावाचा मृत्यू झाला.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.