नात्याला काळिमा फासणारी घटना, चुलत बहिणीसोबत जुळले प्रेमसंबंध; काकूने विरोध केला म्हणून…

भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या अनैतिक प्रेमसंबंधातून तरुणाने जे टोकाचे पाऊल उचलले, त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली.

नात्याला काळिमा फासणारी घटना, चुलत बहिणीसोबत जुळले प्रेमसंबंध; काकूने विरोध केला म्हणून...
अनैतिक संबंधाच्या वादातून पुतण्याने काकीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 7:27 PM

समस्तीपूर : नात्याला काळिमा फासणारी एक घटना बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. भावा-बहिणीचं नातं खूप पवित्र मानलं जातं. पण हेच नातं कलंकित केल्याची घटना घडली आहे. तरुणाचे चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर त्यांनी गुपचूप लग्नही केले. याबाबत मुलीच्या आईला माहिती मिळताच तिने दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तरुणाने आपल्या काकूची हत्या केल्याची घटना घडली. 27 मार्च रोजी झालेल्या महिलेच्या हत्याकांडाटा खुलासा करण्यास पोलिसांना यश आले आहे.

आरोपीने चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध

मोहिउद्दीन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसिंगपूर गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पुतण्याला अटक केली आहे. धीरज कुमार गिरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मयत बबिता देवी ही आरोपीची सख्खी काकी असून, तिच्या मुलीसोबत आरोपीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. दोघांनीही 2021 मध्ये मोरवा मंदिरात लग्न केले आणि घरात गुपचूप पती-पत्नीसारखे राहू लागले.

काकू दोघांना वेगळं करु पाहत होती म्हणूनच…

दोन-तीन महिन्यांपूर्वी या अनैतिक संबंधाची माहिती मुलीच्या आईला समजली. यानंतर महिलेने आपल्या मुलीला बहिणीच्या घरी पाठवले. दरम्यान, 4 फेब्रुवारी रोजी मुलगी घरी परतली. त्यानंतर या जोडप्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा महिलेने आपल्या मुलीला बहिणीच्या घरी पाठवले. यानंतर महिला आपल्या मुलीला गुजरात किंवा मुंबईला पाठवणार असल्याचे आरोपीला कळले. यामुळे संतापलेल्या आरोपी काकीची हत्या केली. अटक केल्यानंतर मोहिउद्दीन नगर पोलिसांनी आरोपी धीरज गिरी याला न्यायालयात हजर केले आणि त्याची कारागृहात रवानगी केली.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.