मोठा भाऊ सतत दादागिरी करायचा, लहान भाऊ विरोध करायचा, मग जे घडलं त्याने रक्ताच्या नात्यालाच कलंक लागला !

मोठा भाऊ दारुच्या नशेत लहान भावांशी भांडण करायचा. त्यांना मारहाणही करायचा. लहान भाऊ याला विरोध करायचा. मग पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे.

मोठा भाऊ सतत दादागिरी करायचा, लहान भाऊ विरोध करायचा, मग जे घडलं त्याने रक्ताच्या नात्यालाच कलंक लागला !
कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवले
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 12:17 PM

नवादा : मोठा भाऊ सतत घरात दादागिरी करायचा. लहान भावांना मारहाण करायचा. भावाच्या या वर्तनाला विरोध केल्याने मोठ्या भावाने लहान भावाला संपवल्याची धक्कादायक घटना बिहारमधील नवादामध्ये उघडकीस आली आहे. या घटनेमुळे रक्ताच्या नात्यालाच कलंक लागला आहे. विभीषण शर्मा असे मयत भावाचे नाव आहे. यावेळी विभीषणला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या आई आणि लहान भावावरही आरोपीने हल्ला केला. यात आई आणि भाऊ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तर आरोपी भाऊ आणि वहिनीला बेड्या ठोकल्या.

आरोपीला दारुचे व्यसन होते

आरोपी भावाला दारुचे व्यसन होते. यातूनच तो दररोज घरी लहान भावांना मारहाण करायचा. त्यांच्यावर दादागिरी करायचा. विभीषण मोठ्या भावाच्या त्रासाला विरोध करायचा. यामुळे त्याचा विभीषणवर राग होता. याच रागातून त्याने हे हत्याकांड घडवले. विभीषण घरातील वरच्या खोलीत झोपला असताना आरोपी विपीन तेथे गेला. त्याने वस्तऱ्याने 17 वार विभीषणवर केले. विभीषणचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरचे धावत गेले. यावेळी आई आणि अन्य लहान भावावरही त्याने हल्ला केला.

उपचारादरम्यान लहान भावाचा मृत्यू

हल्ल्यात जखमी विभीषण, त्याची आई कंचनदेवी आणि लहान भाऊ लल्लू यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान विभीषणचा मृत्यू झाला. तर आई आणि भावावर उपचार सुरु आहेत. विभीषणच्या मृत्यूमुळे त्याच्या तीन मुलांना पितृछत्र हरवले आहे. पोलिसांनी आरोपी विपीन आणि त्याची पत्नी सुशीला यांना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.