प्रियकराला रात्री घरी बोलावले, मग जे घडलं त्याने अख्ख गाव सुन्न झालं !

त्या दोघांचे चार वर्षापासून अनैतिक संबंध सुरु होते. नेहमीप्रमाणे प्रियकर प्रेयसीला भेटायला मध्यरात्री घरी गेला. पण तो दिवस त्याचा अखेरचा ठरला.

प्रियकराला रात्री घरी बोलावले, मग जे घडलं त्याने अख्ख गाव सुन्न झालं !
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह मुलीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 2:30 PM

मुजफ्फरपूर : अनैतिक संबंधातील त्रासाला कंटाळून प्रेयसीनेच प्रियकराचा काटा काढल्याची धक्कादायक घटना बिहारमधील मुजफ्फरपूर येथे घडली. महिलेने प्रियकराला घरी बोलावले, मग त्याला बेदम मारहाण केली. नंतर त्याची हत्या केली आणि मृतदेह शेतात पुरला. यानंतर महिलेने स्वतः पोलीस ठाण्यात दाखल होत गुन्ह्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवत पुढील तपास सुरु केला आहे. प्रमोद कुमार असे मयत प्रियकराचे नाव आहे. महिला आणि मयत युवक दोघेही विवाहित आहेत.

चार वर्षांपासून सुरु होते प्रेमसंबंध

आरोपी महिलेचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला असून, तिला तीन मुलंही आहेत. महिलेचा पती नोकरीनिमित्त बाहेर असतो. मयत प्रमोद कुमारचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला आहे. दोघांमध्ये चार वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. काल रात्री 1 वाजता प्रमोदकुमार महिलेच्या घरी तिला भेटायला गेला होता. यावेळई दोघांमध्ये काही कारणातून वाद झाला. या वादातून महिलेने त्याची हत्या केली.

अन्य आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरु

हत्येनंतर मृतदेह शेतात पुरत असताना गावातील एका व्यक्तीने पाहिले. त्या व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान महिलेने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत आपण प्रियकराची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. प्रमोद खूप त्रास द्यायचा म्हणून आपण त्याला संपवल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. हत्याकांडात महिलेव्यतिरिक्त 5 ते 7 जणांचा सहभाग असून, सर्व जण फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.