काही कारणातून दोघांमध्ये वाद झाला, मग त्याने धमकी दिली, यानंतर प्रेयसीने जे केले ते पाहून पोलीसही चक्रावले !

प्रेमी जोडप्यामध्ये काही कारणातून वाद झाला होता. या वादातून प्रियकर प्रेयसीला धमकावत होता. या धमकीमुळे प्रेयसीने जे केले ते पाहून एकच खळबळ उडाली.

काही कारणातून दोघांमध्ये वाद झाला, मग त्याने धमकी दिली, यानंतर प्रेयसीने जे केले ते पाहून पोलीसही चक्रावले !
प्रेमाच्या जाळ्यात ओढत महिलेला लाखोंचा गंडा
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 11:45 AM

अररिया : प्रेमसंबंधातील छोट्या छोट्या वादातून जोडीदाराला संपवण्याच्या घटनांमध्ये हल्ली वाढ झाली आहे. आधी प्रेमात पडायचं, मग थोडं खटकलं की लगेच काटा काढायचा. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधील अररिया जिल्ह्यात घडली आहे. प्रियकर आणि प्रेयसीचे काही कारणातून वाद झाले. यातून प्रियकराने तिला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या कारणातून प्रेयसीने डेटिंगच्या बहाण्याने बोलावून प्रियकराचा काटा काढला. हत्येची मोडस ऑपरेंडी पाहून तुम्हालाही धक्का बसेल. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रेयसीला अटक केली आहे. प्रकाश असे मयत प्रियकराचे नाव आहे, तर रंजिता असे आरोपी प्रेयसीचे नाव आहे.

दोघांमध्ये वाद झाला, मग प्रियकर तिला धमकावत होता

प्रकाश आणि मंजिता हे दोघे पूर्णिया येथील लाईन बाजार येथील इंद्रप्रस्थ डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एकत्र काम करायचे. मग रंजिता राणीगंजमधील एका खासगी नर्सिंग होममध्ये कामाला लागली. दरम्यान, दोघांमध्ये काही कारणातून वाद झाला. यानंतर प्रकाशने रंजिताला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर रंजिताने प्रकाशला संपवण्याचा कट रचला. त्यानुसार तिने प्रकाशला डेटिंगच्या बहाण्याने राणीगंज येथे बोलावले.

भेटायला बोलावले अन् काटा काढला

प्रकाश रंजिताला भेटायला ठरल्या ठिकाणी पोहचला. प्रकाश भेटायला आल्यानंतर रंजिताने आधी त्याला इंजेक्शन टोचून बेशुद्ध केले. मग रॉकेल टाकून त्याला जाळले. मग मृतदेह जमिनीत गाडला. दुसरीकडे प्रकाश घरी परतला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. यानंतर पूर्णिया पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी प्रकाशचे शेवटचे मोबाईल लोकेशन तपासले असता राणीगंज असल्याचे कळले. तसेच पोलिसांना प्रकाशचे शेवटचे बोलणे रंजिताशी झाल्याचे कळले.

हे सुद्धा वाचा

असा उघडकीस आला गुन्हा

पोलिसांनी रंजिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यानंतर शेवटच्या लोकेशनच्या ठिकाणी तपास सुरु केला. पोलीस चौकशीत रंजिताने गुन्ह्याची कबुली दिली. तरुणीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी जमिनीतून प्रकाशचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आरोपी प्रेयसीवर हत्येचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.