सायकल देण्यास नकार दिला, भावांनी मिळून तरुणाला बेदम चोपले, मग…

गावातील एक तरुण दुसऱ्या तरुणाकडे सायकल मागायला आला. पण तरुणाने सायकल देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या तरुणाने जे केले ते पाहून पोलीसही चक्रावले.

सायकल देण्यास नकार दिला, भावांनी मिळून तरुणाला बेदम चोपले, मग...
सायकल दिली नाही म्हणून तरुणाला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 8:33 PM

समस्तीपूर : बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सायकल देण्यास नकार दिला म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील पटोरी उपविभागातील मोहनपूर येथे दसरा खराड बरेठा येथील प्रभाग 11 मध्ये ही घटना घडली. भूषण पासवान असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. सध्या सर्व आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी समस्तीपूर सदर रुग्णालयात पाठवला आहे.

सायकल देण्यास नकार दिला म्हणून हत्या

गावातील विष्णुदेव पासवान हा भूषण पासवान याच्याकडे सायकल मागण्यासाठी आला होता. मात्र भूषणने त्याला सायकल देण्यास नकार दिला. त्यामुळे विष्णुदेवने त्याला शिवीगाळ केली, मग मारहाण सुरू झाली. यानंतर विष्णुदेवने भूषणला ओढत काही अंतरावर नेले. तेथे त्याचे इतर भाऊही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना बेदम मारहाण केली. घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य गावातील लग्नाला गेले होते आणि भूषण घरी एकटाच होता. कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मात्र तोपर्यंत मारहाण करणारे सर्वजण घटनास्थळावरून पळून गेले.

आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना

कुटुंबीयांनी तात्काळ भूषणला मोहिउद्दीन नगर आरोग्य केंद्रात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सातत्याने छापेमारी करत आहेत. यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.