पती दुबईला व्यवसायानिमित्त गेला होता, परत आल्यानंतर पत्नीने थेट यमसदनीच धाडला, कारण काय?

पती अनेक वर्षे दुबईत काम करत होता. दुबईतून परतल्यानंतर पत्नीनेच त्याचा काटा काढायचा कट रचला. कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

पती दुबईला व्यवसायानिमित्त गेला होता, परत आल्यानंतर पत्नीने थेट यमसदनीच धाडला, कारण काय?
अनैतिक संबंधासाठी पत्नीने पतीला संपवले
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 7:55 AM

पटना : पती दुबईहून मायदेशी परतला होता. मात्र पतीच्या परतण्याने आनंद होण्याऐवजी पत्नीच्या डोक्यात वेगळाच कट शिजत होता. अनैतिक संबंध आणि पतीकडून होणारा छळाला कंटाळल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला. बिहारमधील गोपालगंड जिल्ह्यातील लाढपूर गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद मिया असे मयत पतीचे नाव आहे. सुपारी किलरच्या मदतीने पतीची हत्या केली. पोलिसांनी आरोपींकडून 75 हजार रुपये, एक पिस्तुल, 3 जिवंत काडतूस, 5 मोबाईल आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

पतीला मारण्यासाठी 50 हजाराची सुपारी

मोहम्मदची पत्नी नूरजहा खातून हिचे नौशाद आलम याच्याशी अनैतिक प्रेमसंबंध होते. याची माहिती पतीला मिळताच दोघांमध्ये वाद होत होते. मोहम्मद नूरजहाला मारहाणही करत असे. याला कंटाळून पत्नीने त्याला संपवण्याचा कट रचला. यासाठी तिने दोन सुपारी किलर्सना पतीला ठार मारण्यासाठी 50 हजार रुपयांची सुपारी दिली. सुपारीच्या पैशातून एक पिस्तुल आणि चार जिवंत काडतूस खरेदी केले. मोहम्मद घराबाहेर खाटेवर झोपला होता. तेव्हा महिला आरोपींशी फोनवर बोलत होती आणि खिडकीतून पाहत होती. आरोपींनी तिच्यासमोरच पतीला गोळ्या घातल्या.

पती दुबईला गेल्यानंतर पत्नीचे दुसऱ्यासोबत प्रेम जुळले

मोहम्मद मिया बराच कालावधी दुबईत होता. पत्नी सहा मुलांसोबत एकटीच राहत होती. यावेळी तिचे नौशादसोबत प्रेमसंबंध जुळले. महिलेने सांगितले की, तिचा पती तिला पत्नीप्रमाणे वागणूक देत नव्हता. तिने पतीला सांगितले होते की, तिला मुलांसह नौशादसोबत रहायचे आहे. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. यातून पतीने हे कृत्य केले. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.