चोरट्यांनी दहा घर फोडली, गावकरी हुशार असल्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीचं लागले नाही, घाबरलेल्या गावकऱ्यांनी…

बुलढाणा जिल्ह्याच चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे गावातील लोकं सुध्दा घाबरले आहेत. काही तरुण गावांमध्ये रात्रभर जागरण करुण गस्त घालत आहेत.

चोरट्यांनी दहा घर फोडली, गावकरी हुशार असल्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीचं लागले नाही, घाबरलेल्या गावकऱ्यांनी...
crime newsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 8:36 AM

गणेश सोळंकी, बुलडाणा : चावरा गावात (Chavara Village) चोरट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. गावकरी रात्रभर जागून चावरावासी गावात पहारा देत आहेत. त्याचबरोबर गावातील युवक सुध्दा रात्रभर जागरण करुण गस्त घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. बुलडाणा जिल्ह्यात चोऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून चोरांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे (buldhana crime news) वळविला आहे. काही दिवसांपासून चावरा गावात मध्यरात्रीच्या दरम्यान काही चोर गावात घुसत आहेत. काही ठिकाणी त्यांनी चोऱ्या देखील केल्या आहेत. त्यामुळे चावरावासी (buldhana breaking news) भयभीत झाले आहेत. संपूर्ण चावरा गाव दहशतीखाली आहे.

चोरट्यांचा स्वतःच बंदोबस्त करण्याचा निर्णय

त्यामुळे आता उपाय म्हणून गावातील युवक आपल्या गावात रात्रंदिवस जागता पाहता देताना दिसत आहेत. हातात लाठ्या काठ्या घेऊन हे युवक आपल्या गावाचे राखण करीत आहेत. चोरट्यांचा स्वतःच बंदोबस्त करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असून गावातील युवक चोरीच्या घटना होऊ नये, यासाठी झटत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

मेहकर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे काल एकाच रात्री तब्बल दहा घरी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. मात्र या चोरट्यांना खाली हात परतावं लागलं आहे. या घटनेमुळे देऊळगाव माळी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं असून मेहकर पोलिसांच्या कार्यक्षमतावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. काल रात्री सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या दहा घरावर दरोडा टाकला. पण, चोरट्यांना खाली हातानेच परतावे लागले. कारण त्यांच्या हातात काहीच लागले नाही. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पंचनामा करून चोरट्यांचा तपास सुरू केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.