भावाच्या प्रेयसीवर वाईट नजर टाकायचा, अखेर भावाने परफेक्ट प्लानिंग करुन काटा काढला; पण…

पोलिसांना एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. आरोपींनी मयताची ओळख पटू नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली होती. मात्र एक चूक केली अन् थेट तुरुंगात गेले.

भावाच्या प्रेयसीवर वाईट नजर टाकायचा, अखेर भावाने परफेक्ट प्लानिंग करुन काटा काढला; पण...
प्रेमप्रकरणातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 5:00 PM

बिलासपूर : प्रेयसीवर वाईट नजर टाकायचा म्हणून चुलत भावाने प्रेयसी आणि मित्राच्या मदतीने भावाचा काटा काढल्याची घटना छत्तीसगडमधील बिलासपूर येथे घडली. मयत तरुण विवाहित होता. मात्र तरीही तो आपल्या चुलत भावाच्या प्रेयसीसोबत बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित करत होता. दीपक यादव असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये मयताचा चुलत भाऊ, त्याची प्रेयसी आणि भावाचा मित्र यांचा समावेश आहे. तर अन्य एक आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दीपकची शुक्रवारी हत्या झाली होती. घटनेनंतर दोन दिवसात पोलिसांना हत्येचा उलगडा करण्यास यश आले आहे.

बिलासपूर जिल्ह्यातील चकरभाठा भागातील सेंट्रल पॉइंट हॉटेलच्या मागे शुक्रवारी सकाळी शेतात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. शरीरावर जखमेच्या खुणा होत्या आणि जवळच बिअरची तुटलेली बाटली पडली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

सोशल मीडियावर तरुणाची माहिती मिळाली

तरुणाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर त्याचे नाव दीपक यादव असून तो घर सरकंडा परिसरातील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तरुणाच्या घरी दाखल होत घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली आणि चौकशी सुरु केली. चौकशीत दीपक शाळेत ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचे समोर आले. दीपकची अधिक चौकशी केली असता त्याचे कोणाशीही वैर नसल्याचे कळले.

हे सुद्धा वाचा

‘असा’ झाला आरोपीचा उलगडा

पोलिसांसह फरेन्सिक टीमही आपली कामगिरी चोख बजावत होती. मृतदेहाजवळ सापडलेल्या बिअरची तुटलेली बाटली सापडली होती. या बाटलीच्या झाकणाच्या मुखपृष्ठावरील होलोग्रामची माहिती मिळाली. होलोग्रामवरुन व्यापारी विहार परिसरातील एका दारूच्या दुकानातून बिअरची बाटली खरेदी केल्याचे समोर आले. पोलिसांनी सदर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये दीपक आपल्या चुलत भाऊ आणि एका तरुणासोबत बिअर खरेदी करताना दिसला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दीपकचा चुलत भाऊ दुर्गेश यादवला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने सर्व हकीकत कथन केली. दीपक हा विवाहित असूनही त्याची दुर्गेशच्या प्रेयसीवर नजर होती. दीपक दुर्गेशच्या प्रेयसीशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवायचा. याबाबत महिलेने दुर्गेशला सांगितले. त्याने प्रेयसी आणि मित्राच्या मदतीने दीपकचा काटा काढला.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.