शारीरिक संबंधावरुन वादानंतर पत्नीनं विहिरीत उडी मारली, पतीने आधी वाचवलं आणि नंतर…

पतीने पत्नीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र पत्नीने पतीला साफ नकार दिला. यावरुन पती-पत्नीमध्ये वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यानंतर जे घडले ते धक्कादायक होते.

शारीरिक संबंधावरुन वादानंतर पत्नीनं विहिरीत उडी मारली, पतीने आधी वाचवलं आणि नंतर...
शरीरसुखाला नकार देणाऱ्या पत्नीला पतीने संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 8:43 PM

जशपूर : छत्तीसगडमध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंधावरुन झालेल्या वादातून धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगडमधील जशपूरमध्ये ही घटना घडली. पती-पत्नीचा वाद झाल्यानंतर पत्नीने जीवन संपवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. यानंतर पतीनेही विहिरीत उडी घेत पत्नीला वाचवले. मग विहिरीजवळच तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. शंकर राम असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

शारीरिक संबंधावरुन दोघांमध्ये वाद झाला

बगीचा पोलीस ठाण्याअंतर्गत रौनी गावात शंकर राम आपली पत्नी आशाबाईसह राहत होता. दोघा पती-पत्नीने सोमवारी रात्री दारु प्यायली आणि दोघे झोपायला निघून गेले. यावेळी शंकरने आशाकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. पत्नीने नकार दिल्याने दोघांमध्ये वाद सुरु झाला. वाद इतका विकोपाला गेला की आशाने आत्महत्या करण्याच्या हेतूने विहिरीत उडी घेतली. पत्नीला वाचवण्यासाठी शंकरनेही पाण्यात उडी घेतली. थोड्या वेळाने त्याने पत्नीला सुखरुप बाहेर काढले.

पत्नीला विहिरीतून वाचवले मग हत्या केली

विहिरीतून पत्नीला बाहेर काढल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद सुरु झाला. या वादातून शंकरने आशावर जीवघेणा हल्ला करत तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर शंकर रात्रभर पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता. सकाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मृतेदह ताब्यात घेतला. घटनास्थळावरुन आरोपी पतीला अटक केली. बगीचा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.