मॅट्रीमोनियल साईटवर डॉक्टर असल्याची बतावणी केली, दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या; मग नर्ससोबत जे घडले…

मॅट्रीमोनियल साईटवर एक नर्स लग्नासाठी मुलगा शोधत होती. यावेळी तिची निलेश मांडे नावाच्या तरुणाशी ओळख झाली. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सत्य समोर येताच नर्सच्या पायाखालची जमीन सरकली.

मॅट्रीमोनियल साईटवर डॉक्टर असल्याची बतावणी केली, दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या; मग नर्ससोबत जे घडले...
मॅट्रीमोनियल साईटवर तरुणीची फसवणूकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 1:02 PM

रायपूर : मॅट्रीमोनियल साईटवर एम्स रुग्णालयात डॉक्टर असल्याचे सांगत नर्सशी मैत्री केली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे बलात्कार केल्याची घटना छत्तीसगडमधील रायपूरमध्ये उघडकीस आली आहे. अभानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपी हा एका रुग्णालयात वॉर्डबॉयची नोकरी करतो. त्याने मॅट्रीमोनियल साईटवर डॉक्टर असल्याचे सांगत नर्ससोबत मैत्री केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीने आणखी किती तरुणींची अशा प्रकारे फसवणूक केली याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

मॅट्रीमोनियल साईटवर आरोपीशी ओळख झाली

पीडित नर्स लग्नासाठी ऑनलाइन मॅट्रिमोनीयल साईटवर मुलगा शोधत होती. यादरम्यान तिची ओळख आरोपी निलेश मांडे याच्याशी झाली. मॅट्रीमोनियल साईटवर तरुणाने स्वतःला रायपूर एम्समधील एक मोठा डॉक्टर असल्याचे सांगितले होते. यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. हळू हळू दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. मग लग्नाचे आमिष दाखवत आरोपी पीडितेवर दोन वर्षे बलात्कार करत होता.

दोन वर्षानंतर आरोपी डॉक्टर नसून वॉर्डबॉय असल्याचे कळले

यादरम्यान त्याने दुसऱ्या मुलीशी साखरपुडाही केला. मात्र पीडितेला त्याच्यावर संशय येऊ लागल्याने तिने त्याची माहिती काढली, तेव्हा तिला कळले की आरोपी डॉक्टर नसून, वॉर्डबॉय आहे. यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. मग तरुणीने पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.