आधी 16 लाखांचा विमा काढला, मग पत्नीचा घातपात घडवला; पण…
आधी आरोपीने पत्नीच्या नावे 16 लाख रुपयांचा विमा काढला. मग 20 दिवसांनी पत्नीची हत्या केली. हत्येचे नियोजन असे केले होते की पोलीस दोन वर्ष या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र हाती काहीच लागत नव्हते.
महासमुंद : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा काटा काढून अपघाताचा बनाव करणाऱ्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नीची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर घातपात झाल्याचा बनाव केला. आरोपीने नियोजन पद्धतीने पत्नीची हत्या केली होती. हत्येच्या 20 दिवसांपूर्वी पत्नीचा 16 लाख रुपयांचा विमा काढला होता. दोन वर्ष पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. पण विम्यामुळे या हत्याकांडाचा उलगडा होण्यास मदत झाली. अधिक तपास करत असताना पोलिसांना पतीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. यानंतर पतीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येचा खुलासा केला.
पतीच्या अनैतिक संबंधाला करत होती विरोध
आरोपी परमानंद यादव याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. पत्नीचा या संबंधांना विरोध होता. यामुळे परमानंद आणि त्याची पत्नी संतोषी यांच्यात रोज वाद होत होते. या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्याने नियोजनपद्ध पद्धतीने पत्नीच्या हत्येचा कट रचला.
आधी पत्नीच्या नावे विमा काढला मग हत्या
आधी आरोपीने पत्नीच्या नावे 16 लाख रुपयांचा विमा काढला. मग 20 दिवसांनी पत्नीची हत्या केली. हत्येचे नियोजन असे केले होते की पोलीस दोन वर्ष या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र हाती काहीच लागत नव्हते. याचदरम्यान पोलीस अधीक्षक धर्मेंद्र सिंह यांनी सर्व प्रलंबित गुन्ह्याच्या प्रकरणांचे निराकरण करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
दोन वर्षानंतर हत्याकांडाचा उलगडा
यानंतर पोलिसांनी दोन वर्षापूर्वीच्या संतोषी यादव हत्याकांडाचा पुन्हा कसून तपास सुरु केला. याचदरम्यान संतोषीचा पती परमानंद वारंवार पोलीस ठाण्यात येऊन विम्याचे पैसे मिळवण्यासाठी केस बंद झाली का असे विचारत असे. यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी पतीला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.