आईला तो मारत होता, चिमुकली किंचाळत होती, ऐकून काकू आली पण तिने ते दृश्य पाहून…

तीन दिवसापूर्वीच ती माहेरुन परतली होती. पतीसोबत तिचा काही कारणाने वाद झाला. याच वादाचा राग मनात धरुन पती घराबाहेर गेला. मग रात्री उशिरा घरी परतला अन् काही वेळातच किंचाळी ऐकू आली.

आईला तो मारत होता, चिमुकली किंचाळत होती, ऐकून काकू आली पण तिने ते दृश्य पाहून...
क्षुल्लक कारणातून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 7:15 PM

साहिया : मायलेकी रात्री आपल्या बेडरुममध्ये निवांत झोपल्या होत्या. मात्र पतीच्या मनात काही वेगळेच होते. त्याने झोपेत असलेल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. बाप आईला मारत असतानाच चिमुकलीला जाग आली आणि जोरात किंचाळू लागली. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिची काकू धावत आली पण तोपर्यंत उशिर झाला होता. महिलेचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. गजेंद्र सिंह असे आरोपी पतीचे नाव आहे. डेहराहून जिल्ह्यातील कालसी तहसिलअंतर्गत फटेऊ गावात ही घटना घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवल्याची प्राथमिक माहिती मिळते.

वाद टोकाला गेला अन्…

गजेंद्रचा पत्नी गुड्डीदेवीसोबत दुसरा विवाह झाला होता. गुरुवारी गजेंद्रचा पत्नीसोबत वाद झाला होता. यानंतर रागावलेला गजेंद्र घरातून निघून गेला. यानंतर गुड्डीदेवी आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह रुममध्ये झोपली. पत्नी झोपल्यानंतर रात्री उशिरा गजेंद्र घरी आला. यानंतर त्याने झोपलेल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला आणि जंगलात पळून गेला. आईवर हल्ला होत असताना अडीच वर्षाच्या चिमुरडीला जाग आली. आईवर हल्ला होताना पाहून चिमुकली जोरात किंचाळू लागली.

मुलीचा आवाज ऐकून काकू धावत आली

मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुलीची काकू रुममध्ये धावत आली. मात्र रुममधील दृश्य पाहून तिला धक्काच बसला. तिने आरडाओरडा केल्यानंतर तिचाही पतीही धावत आला. शेजाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीनेही गुन्ह्याची कबुली दिली आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.