ढोलकी फाडताच समोर जे दृश्य दिसलं ते पाहून सर्वच अवाक् झाले, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
घरात झडती घेत असताना पोलिसांना आरोपीच्या घरी एक ढोलकी सापडली. ही ढोलकी जेव्हा पोलिसांनी फोडली तेव्हा जे समोर दिसले ते पाहून सर्वच अवाक् झाले.
दिल्ली : एका चालकाने आपल्या मालकाच्या घरी 20 लाख रुपयांची चोरी केली आणि रोकड घेऊन फरार झाला. चोरी केल्यानंतर आरोपी आपल्या पीलीभीत येथील घरी आला. चोरीची घटना उघडकीस येताच मालकाने पोलिसात तक्रार नोंदवली. यानंतर दिल्ली पोलिसांनी पीलीभीत पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घरी छापा टाकला. चोरीची रोकड शोधण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली. झडतीवेळी जे दिसले ते पाहून पोलीसही चक्रावले.
चोरीची तक्रार दाखल होताच पोलिसांची आरोपीच्या घरी छापेमारी
घरात झडती घेत असताना पोलिसांना आरोपीच्या घरी एक ढोलकी सापडली. ही ढोलकी जेव्हा पोलिसांनी फोडली तेव्हा जे समोर दिसले ते पाहून सर्वच अवाक् झाले. आरोपीने ढोलकीच्या आत चोरीची रोकड लपवून ठेवली होती.
पोलिसांनी रोकड जप्त करत आरोपीला अटक केली आहे. यानंतर दिल्ली पोलीस त्याचा ताबा घेतला. पवन कुमार शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिल्लीत व्यापाऱ्याकडे करत होता ड्रायव्हरची नोकरी
पवन कुमार हा दिल्लीतील व्यापारी बी.के.सभरवाल यांच्याकडे ड्रायव्हरची नोकरी करत होता. सभरवाल यांची 2 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे बिझनेस मिटिंग होती. त्यासाठी ते आपल्या कारने ड्रायव्हरसह तेथे गेले. यावेळी त्यांच्या गाडीत 20 लाखांची रोकड होती.
कार पार्किंगच्या बहाण्याने मालकाला उतरवत रक्कम घेऊन पसार झाला
सभरवाल यांना कार पार्किंगच्या बहाण्याने पवन कुमारने कारमधून उतरवले आणि गाडीतील 20 लाख रुपयांची रोकड आणि गाडीची चावी घेऊन पळून गेला. यानंतर सभरवाल यांनी पोलिसांत तक्रार दिली.
तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी पिलीभीत पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी पिलीभीतच्या बिलसांडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांसह आरोपीच्या घरी छापा टाकला.
आधी उडवाउडवीची उत्तरे दिली
पोलिसांनी पैशांबाबत विचारणा केली असता सुरवातीला पोलिसांना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने दोन लाख रुपये खर्च केले आणि उरलेले 18 लाख रुपये ढोलकीत पैसे लपवून ठेवल्याचे सांगितले.
यानंतर पोलिसांनी ढोलकीची फोडून रक्कम जप्त केली. आरोपी पवन कुमारला अटक करत पुढील कारवाई करत आहेत.