पतीच्या नोकरीवरुन पती-पत्नीत वाद झाला, वाद विकोपाला गेला अन् मग दोन निष्पाप मुली अनाथ झाल्या !

पती-पत्नीमध्ये घरगुती वाद झाला. हा वाद विकोपाला गेला अन् भलतेच घडले. पती-पत्नीच्या या वादामुळे दोन मुली कायमच्या आईच्या मायेला पारख्या झाल्या.

पतीच्या नोकरीवरुन पती-पत्नीत वाद झाला, वाद विकोपाला गेला अन् मग दोन निष्पाप मुली अनाथ झाल्या !
घरगुती वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: freepik
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 10:47 PM

दिल्ली : घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील बाबा हरदास नगर परिसरात घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. घरात पती-पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पती-पत्नीला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित केले, तर जखमी पतीवर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. नेहा असे मयत पत्नीचे नाव आहे, तर विक्की असे आरोपी पतीचे नाव आहे.

आर्थिक चणचणीतून पती-पत्नीमध्ये वाद व्हायचे

विक्की गेल्या चार-पाच महिन्यांपासून कामाला जात नव्हता. नेहा घरकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. दोघांना 13 वर्षाची आणि 5 वर्षाची अशा दोन मुली आहेत. पती कामधंदा करत नसल्याने घरखर्च आणि मुलींचा खर्च या सर्वाचा ताण नेहावर एकटीवर येत होता. यामुळे आर्थिक चणचणीतून पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण व्हायचे. बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळी दोघांमध्ये वाद झाला.

वाद टोकाला गेला अन्…

भांडणातून विक्कीने नेहावर गंभीर वार करत तिची हत्या केली. यानंतर स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. घटना घडली तेव्हा नेहाची छोटी मुलगी शाळेत गेली होती, तर मोठी मुलगी घरात होती. यावेळी मोठ्या मुलीने आरडाओरडा केल्याने शेजारी धावत आले. शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गुन्ह्यातील हत्यार जप्त केले आहे. पती-पत्नीच्या वादात दोन मुली आई-वडिलांच्या मायेला पारख्या झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.