एक होता गायक, दुसरा कंप्युटर प्रशिक्षक, दोघांचा मायलेकींच्या पैशांवर डोळा, अखेर अघटीत घडले
बॅंकेतील पैसे कसे काढायचे यासाठी त्याने वकीलांचाही सल्ला घेतला. परंतू राजराणी यांचे डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बॅंकींग नसल्याने अडचण आली. मग त्यांनी सरळ मायलेकींना...
दिल्ली : दिल्लीच्या कृष्णानगर परिसरातील एका सोसायटीत दुर्गंधी येत असल्याने आधी सोसायटीत उंदीर किंवा कबूतर मेले असावे म्हणून साफ सफाई केली. नंतर तरीही दुर्गंधी काही केल्या कमी होत नसल्याने अखेर 31 मे रोजी पोलीसांना पाचारण करण्यात आले. तर पोलीसांनी एका बऱ्याच दिवस बंद असलेल्या घराची खिडकी तोडून घरात प्रवेश केला असता घरात मायलेकींचा मृतदेह विच्छीन्न अवस्थेत सापडला. नंतर पोलीसांच्या टीमने तपास सुरू केला.
पोलीसांनी 200 सीसीटीव्हींचा तपास केला, तेव्हा आरोपींचा ठावठिकाणा कळाला. परंतू मिडीयात आलेल्या बातम्या पाहून ते तेथून निसटले होते. डीएसपी शाहदरा रोहीत मीना यांनी सांगितले की आरोपी केवळ एकमेकांशी व्हॉट्सअपवर बोलायचे, त्यामुळे त्यांना पकडणे कठीण होते. पाच शहरे, 2000 किमीचा प्रवास केल्यानंतर आरोपी अंकित कुमार सिंह याला तिमारपूरहून अटक झाली. दुसरा आरोपी किशन यालाही अटक झाली.
वकीलांचाही सल्ला घेतला
किशन नोएडातील कंपनीत मार्केटींग मॅनेजर होता. त्याने पार्ट पाईम होम ट्यूशनचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते. राजराणी ( वय 73 ) यांना एप्रिल महिन्यापासून तो संगणक शिकवू लागला. त्याने त्यांचा विश्वास संपादन केला तेव्हा त्याला राजराणी यांच्या बॅंकेत पन्नास लाख असल्याचे कळले. तेव्हा त्याने या वृद्ध महिलेला लुटण्याचा प्लान रचला. बॅंकेतील पैसे कसे काढायचे यासाठी त्याने वकीलांचाही सल्ला घेतला. परंतू राजराणी यांचे डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बॅंकींन नसल्याने अडचण आली. महिलेच्या मुलीला इंग्रजी शिकायचे होते. म्हणून त्याने पश्चिम बंगालहून अंकितला बोलावले. 24 मेला अंकित आला त्याला त्याने दिल्लीच्या ओयो हॉटेलात थांबवले, त्यानंतर दोघांनी रेकी करून चाकू खरेदी केले.
जॉब गेल्याने पैशांची गरज होती
अंकीत याला इंग्रजीचा शिक्षक म्हणून त्याने त्या महिलेच्या घरात प्रवेश मिळवून दिला. त्यानंतर 27 मे रोजी ते त्या घरात घुसले. दोन्ही मायलेकींना संपविले. घरातील सीसीटीव्हीचे फुटेज नष्ट केले. नंतर बॅंक खात्यातील पैसे काढण्याचे प्रयत्न त्यांनी केले. नंतर ते गोंडाला पसार झाले. नंतर पुन्हा दिल्लीत येऊन राहू लागले. अंकित ओटीटी साठी गाणी गातो. त्याने गायनाचे कोचिंग क्लासही सुरु केले होते. 25 मार्चला त्याचा जॉब गेल्याने त्याला पैशांची गरज होती. पोलिसांनी त्यांच्याकडून त्या मायलेकींचे तीन आयफोन आणि तीन लॅपटॉप जप्त केले आहे.