धक्कादायक ! जिवलग मित्रानेच मित्राला संपवले, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद; कारण काय?
मारहाणीत जयेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जयेशच्या बहिणीने बिल्डिंग परिसरातील सीसीटीव्ही पाहिले असता तिला मारहाण झाल्याचं कळलं.
डोंबिवली : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. किरकोळ कारणावरून शहरात खुलेआमपणे हत्या आणि मारहाणीच्या घटना वारंवार घडत आहेत. डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केल्याचं समोर आलंय. फक्त एक सिगारेट या हत्येला कारणीभूत ठरली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीला अटक
जयेश देवजी जाधव असे हत्या करण्यात आलेल्या 38 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो डोंबिवलीमधील पेंडसे नगर परिसरारातील तुषार को. हौ. सोसायटी परिसरातील रहिवासी आहे. हरिश्चंद्र उर्फ बकुळ रामदास चौधरी असे हत्या करणाऱ्या 32 वर्षीय आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला चोळेगाव ठाकुर्ली येथून अटक केली.
सिगारेटवरुन झालेल्या वादातून हत्या
मयत आणि आरोपी हे दोघेही मित्र आहेत. जयेश आणि बकुळ या दोघांनीही दारूचं सेवन केलं होतं. त्यानंतर आरोपीने जयेशला सिगारेट आणायला सांगितली. यावरून दोघांचा वाद झाला.
रागाच्या भरात बकुळने आधी हातापायाने जयेशला मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्याचे डोके भिंतीवर आणि जमिनीवर आपटले. या मारहाणीत जयेशचा मृत्यू झाला. आरोपी सध्या अटकेत असून, त्याला कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू
मारहाणीत जयेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. जयेशच्या बहिणीने बिल्डिंग परिसरातील सीसीटीव्ही पाहिले असता तिला मारहाण झाल्याचं कळलं. या मारहाणीमध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
यासंदर्भात जयेशच्या बहिणीने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता ओळखीच्या व्यक्तीनेच जयेशची हत्या केल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली आहे.