dombivali Crime : रक्षाबंधनासाठी जालन्याहून डोंबिवलीत आले होते, इन्स्टा मॅसेजवरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला अन्…

दोघांचा नवीन संसार होता. रक्षाबंधनाच्या निमित्ताने गावाहून बहिणीकडे आले होते. दोघांमध्ये क्षुल्लक वाद झाला. मग नवविवाहितेने जे केले त्यानंतर डोंबिवलीत एकच खळबळ उडाली.

dombivali Crime : रक्षाबंधनासाठी जालन्याहून डोंबिवलीत आले होते, इन्स्टा मॅसेजवरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला अन्...
डोंबिवलीत क्षुल्लक वादातून विवाहितेने जीवन संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 2:20 PM

डोंबिवली / 1 सप्टेंबर 2023 : डोंबिवली नेहमीच गुन्हेगारी कृतींमुळे चर्चेत असते. सतत काही ना काही गुन्हेगारी घटना घडत असल्याने डोंबिवलीची सांस्कृतिक शहर ऐवजी गुन्हेगारीचे शहर अशी ओळख होत चालली आहे. डोंबिवलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जालन्याहून डोंबिवलीत नणंदेकडे आलेल्या नवविवाहितेने क्षुल्लक वादातून जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. डोंबिवलीतील आजदेपाडा येथे ही घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. नवविवाहितेने असे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

जालना येथील करण सोळंके आणि पूजा सोळंके यांचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. दोघे पती-पत्नी रक्षाबंधन सणासाठी करणच्या बहिणीकडे जालन्याहून डोंबिवलीत आले होते. आज सकाळी पत्नीला इन्स्टाग्रामवर एक मॅसेज आला. या मॅसेजवरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. पाहता पाहता वाद विकोपाला गेला. मग रागाच्या भरात पत्नीने नणंदेच्या राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेतली.

घरच्यांनी महिलेला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी एपीआय दत्तात्रय सावंत अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.