मला कुत्र्यांची भीती वाटते त्यांना पट्टे बांधा नाहीतर…. असे म्हणताच श्वान मालकाचे अमानुष कृत्य, वाचा काय घडले?

नेहमीप्रमाणे अशोककुमार हे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. मात्र यावेळी रस्त्यावर दोन कुत्रे फिरत होते. अशोककुमार यांना कुत्र्यांची भीती वाटत होती, म्हणून त्यांनी मालकाला कुत्र्यांना बांधून ठेवण्यास सांगितले.

मला कुत्र्यांची भीती वाटते त्यांना पट्टे बांधा नाहीतर.... असे म्हणताच श्वान मालकाचे अमानुष कृत्य, वाचा काय घडले?
कुत्र्यांना बांधून ठेवण्यास सांगितल्याने जेष्ठ नागरिकाला मारहाणImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 5:44 PM

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : एकीकडे भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो आहे. याचदरम्यान पाळीव कुत्र्यांची देखभाल करण्यातही त्या कुत्र्यांचे मालक बेफिकीर वागत असल्याचे उघडकीस आले आहे. डोंबिवलीच्या खोणी परिसरातील लेकशेअर पलावा वसाहतीत विशिष्ट प्रजातीचे श्वान पाळणाऱ्या बेफिकीर मालकाने एका वृद्ध नागरिकाला शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्या वृद्धावर गंभीर स्वरूपाचा चाकूहल्लाही केला. सोसायटीच्या आवारात मोकळे भटकणाऱ्या दोन श्वानांना पट्टे बांधण्याची विनंती वृद्ध नागरिकाने केली होती. त्याचे वादात पर्यावसान होत कुत्र्यांच्या मालकाने वृद्धावर जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घरातील पाळीव कुत्र्यांची पुरेशी खबरदारी न घेणाऱ्या श्वान मालकाच्या मुजोरीवर परिसरात तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे.

मॉर्निंग वॉकच्या सुमारास वृद्धाला मारहाण

अशोककुमार ठठू असे मारहाण झालेल्या वृद्ध नागरिकाचे नाव आहे. अशोककुमार हे सेवानिवृत्त असून, दररोज मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने सोसायटी आवारात फिरतात. सोसायटीच्या बाहेरील परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत असल्यामुळे ते आपल्याच सोसायटीत मॉर्निंग वॉक करतात. मंगळवारी सकाळीही ते नियमित मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. यावेळी त्यांना सोसायटीच्या आवारात दोन श्वान मोकळे सोडून देण्यात आल्याचे आढळले. ते श्वान हल्ला करू शकतात, या भीतीने अशोककुमार यांनी कुत्र्याच्या मालकाला त्याबाबत अलर्ट केले.

दोन्ही कुत्र्यांना पट्टे बांधण्याची विनंती अशोककुमार यांनी केली होती. कुत्र्यांना पट्टे बांधा, नाहीतर ते माझ्या अंगावर धाऊन येतील, अशा विनम्र शब्दांत अशोककुमार यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुत्र्याच्या मालकाला विनंती केली होती. मात्र ही विनंती देखील कुत्र्याच्या मालकाला खटकली आणि त्याने वृद्ध अशोककुमार यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

शिवीगाळ करत बेदम मारहाण, मग चाकूहल्ला

सुरुवातीला किरकोळ वाटलेल्या हुज्जतीचे काही क्षणांत गंभीर चाकूहल्ल्यात पर्यावसान झाले. अशोककुमार यांना अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ करण्यात आली. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण आणि चाकूहल्ला करण्यात आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दोघांमधील वाद सोडवण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी धाव घेतली होती. मात्र कुत्र्यांच्या मालकाने कुणालाही जुमानले नसल्याचे समजते. चाकू हल्ल्यात अशोककुमार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात श्वान मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...