Dombivali Robbery : ज्वेलर्सची दुकाने चोरट्यांच्या रडारवर, 48 तासात चार दुकाने फोडली
श्रीखंडेवाडी येथील राजलक्ष्मी ज्वेलर्स दुकानाला लागून असलेल्या दोन दुकानांच्या भिंती फोडून त्यांनी या ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत देखील फोडण्याचा प्रयत्न केला. 48 तासात चार दुकान फोडून पाचवे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याने ज्वेलर्स व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
डोंबिवली : ज्वेलर्सची दुकाने सध्या चोरट्यांच्या रडारवर असल्याचे डोंबिवलीत दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी डोंबिवलीत सोनाराच्या दुकानात भगदाड पाडत लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या घटनांमुळे ज्वेलर्स दुकान चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी पहाटे डोंबिवली पश्चिमेत दोन ज्वेलर्स दुकानांची शटर उचकटून चोराने 13 लाखांचा सोने-चांदीचा ऐवज लंपास केला. तर दुसरी घटना शुक्रवारी पहाटे श्रीखंडेवाडी परिसरात घडली आहे. राजलक्ष्मी ज्वेलर्स दुकानाला लागून असलेल्या दोन दुकानांच्या भिंती फोडून चोरांनी या ज्वेलर्सची भिंत देखील फोडण्याचा प्रयत्न केला. गेल्या 48 दिवसात चार दुकाने फोडल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
48 तासात चार दुकाने फोडली
डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा परिसरात काल म्हणजे गुरुवारी पहाटे दोन ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांनी चोरी करत सोने चांदी असे 13 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या 24 तासाच्या आत पुन्हा एकदा डोंबिवली पूर्वेत शुक्रवारी पहाटे श्रीखंडेवाडी परिसरात दुसरी घटना घडली.
पाचवे दुकान फोडण्याचा प्रयत्न
श्रीखंडेवाडी येथील राजलक्ष्मी ज्वेलर्स दुकानाला लागून असलेल्या दोन दुकानांच्या भिंती फोडून त्यांनी या ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत देखील फोडण्याचा प्रयत्न केला. 48 तासात चार दुकान फोडून पाचवे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याने ज्वेलर्स व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या चोरांना आळा घालावा, अशी मागणी आता व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.
साताऱ्यात एका रात्रीत 19 घरे फोडली
सातारा तालुक्यातील परळी भागात असणाऱ्या कुसवडे, मांडवे, धनवडेवाडी, वेचले, निनाम गावांमधील एका रात्रीत चोरट्यांनी तब्बल 19 बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात चोरट्यांना 17 बंद घरांमध्ये काहीही निष्पन्न झाले नाही.