Video : डोंबिवलीत चोरट्यांचा काजू बदाम तूपावर डल्ला, चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

डोंबिवलीच्या राजाजी पथावर जय भवानी सुपर मार्केट आणि मार्टिस मेडिकल ही दुकानं आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास रामनगर पोलीस स्टेशन पासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मार्टिस मेडिकलचं शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

Video : डोंबिवलीत चोरट्यांचा काजू बदाम तूपावर डल्ला, चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
डोंबिवलीत चोरट्यांचा काजू बदाम तूपावर डल्लाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 1:14 PM

डोंबिवली – चोरीच्या अनेक घटना आत्तापर्यंत तुम्ही सीसीटिव्हीच्या (CCTV) माध्यमातून पाहिल्या असतील. त्यामध्ये पैशांची, गाड्यांची किंवा इतर साधनांची चोरी तुम्ही पाहिली असेल. परंतु डोंबिवलीत (Dombivali) एका चोरट्याने चक्क काजू बदाम तूप चॉकलेट आणि महागडे परफ्यूम चोरल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटिव्ही कैद झाली आहे. चोरी झालेली दोन्ही दुकान पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरती आहेत. सीसीटिव्हीत दिसत असलेल्या चोरट्याला तात्काळ पकडण्याची मागणी दुकान मालकाने पोलिसांकडे केली आहे. डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ भागात चोरट्यांनी एक सुपरमार्केट (Supermarket) आणि एका मेडिकल दुकानामध्ये चोरी केली आहे. चोरीच्या या दोन्ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.

पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या दुकानात चोरी

डोंबिवलीच्या राजाजी पथावर जय भवानी सुपर मार्केट आणि मार्टिस मेडिकल ही दुकानं आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास रामनगर पोलीस स्टेशन पासून 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मार्टिस मेडिकलचं शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तब्बल 1 लाख 93 हजारांची रोख रक्कम लंपास केली. दुसरीकडे राजाजी पथावरील जय भवानी सुपर मार्केट या दुकानाचे शटर उचकटून आता प्रवेश केला. तिथे काजू, बदाम, तूप, चॉकलेट, महागडे परफ्यूम आणि काही रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. ही दोन्ही दुकानं रामनगर पोलीस स्टेशनपासून अवघ्या 5 ते 7 मिनिटांच्या अंतरावर असल्यानं चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिलं आहे. या चोरट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी दुकानमालक सुरेश चौधरी यांनी केलीये.

काय आहे व्हिडीओत

रात्रीच्या वेळेस चोरटा दुकानाच्यासमोर उभा आहे. त्याने तोंडाला मास्क लावले आहे. तो तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेत लॉक उघडत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. चोरट्याने दुकानातील महत्त्वाची वस्तू चोरल्या आहेत. त्याचबरोबर काजू, बदाम, तूप, चॉकलेट, महागडे परफ्यूम आणि काही रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.