Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावर LIVE करत जीवन संपवण्याचा प्रयत्न, मेटाच्या सतर्कतेने ‘असा’ वाचला तरुणाचा जीव

गाझियाबादमधील विजयनगरमध्ये राहणारा अभय शुक्ला नोकरी करायचा. त्यानंतर त्याने मोबाईलचा व्यवसाय सुरु केला. मात्र या व्यवसायात त्याचे नुकसान झाले. याच कारणातून नैराश्येतून अभयने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

सोशल मीडियावर LIVE करत जीवन संपवण्याचा प्रयत्न, मेटाच्या सतर्कतेने 'असा' वाचला तरुणाचा जीव
फेसबुकवर लाईव्ह करत जीवन संपवण्याचा प्रयत्नImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 10:57 PM

गाझियाबाद : व्यवसायात नुकसान झाल्याने नैराश्येतून तरुणाने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी तरुण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर लाईव्ह सुरु केले. गळफास लावण्याची तयारी केली. मात्र फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाच्या सतर्कतेमुळे तरुणाला वाचवण्यास यश आले आहे. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. अभय शुक्ला असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अभयला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी सहा तास त्याची काऊन्सलिंग केले.

व्यवसायात नुकसान झाल्याने नैराश्येत होता

गाझियाबादमधील विजयनगरमध्ये राहणारा अभय शुक्ला नोकरी करायचा. त्यानंतर त्याने मोबाईलचा व्यवसाय सुरु केला. मात्र या व्यवसायात त्याचे नुकसान झाले. याच कारणातून नैराश्येतून अभयने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

‘असे’ वाचले तरुणाचे प्राण

अभयने फेसबुक लाईव्ह सुरु करत आत्महत्या करत असल्याचे सांगितले. तो आत्महत्येची तयारी करत होता. लाईव्ह सुरु असतानाच फेसबुक आणि इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटाच्या हेडक्वार्टरने तरुणाच्या लोकेशनसह यूपी पोलिसांना अलर्ट पाठवला.

हे सुद्धा वाचा

मेटाचा मेल मिळताच पोलिसांनी अभयचे लोकेशन ट्रेस केले. पोलिसांना अभय विजयनगर परिसरात लाईव्ह करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी विजयनगर परिसरात अभयचे घर शोधणे कठिण होते.

यासाठी पोलिसांनी दुसरी युक्ती शोधली. विजयनगर पोलीस ठाण्याच्या एसएचओने अभयच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र तो कॉल रिसिव्ह करत नव्हता. मात्र आठवा कॉल त्याने रिसिव्ह केला. यानंतर पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले.

याच दरम्यान पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले आणि त्याच्या घराबाहेर हजर झाले. पोलिसांनी बाहेरुन दरवाजा ठोठावला. अभय याबाबत अनभिज्ञ असल्याने त्याने दरवाजा उघडला तर समोर पोलीस होते.

पोलिसांनी अभय ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. मग त्याची चौकशी केली असता त्याच्या आत्महत्येमागचे कारण पोलिसांना कळले. यानंतर पोलिसांनी त्याचे काऊन्सिलिंग केले.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.