रात्री खर्रा घेण्यास दुकानात गेला तो परतलाच नाही, मग थेट ‘ही’ बातमी आली !

| Updated on: May 20, 2023 | 6:24 PM

वर्षभरापूर्वी शेतात गुरे चरण्यावरुन तरुणाचा वाद झाला होता. याचा राग मनात धरुन तिघा बाप-लेकांनी त्याला रस्त्यात गाठले. यानंतर जे घडले ते भयंकर.

रात्री खर्रा घेण्यास दुकानात गेला तो परतलाच नाही, मग थेट ही बातमी आली !
गोंदियात जुन्या वादातून तरुणाला संपवले
Follow us on

गोंदिया : जुन्या वादातून बापलेकांनी मिळून 28 वर्षीय तरुणाला संपवल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. एक वर्षापूर्वी पीडित आणि आरोपींचा शेतात जनावरे चारण्यावरुन वाद झाला होता. याप्रकरणी तिरोडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे. गुरुदास माणिकचंद रहांगडाले असे मयत तरुणाचे नाव आहे. गुरुदासच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शेतात जनावरे चारण्यावरुन होता वाद

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील भुराटोला येथील एका 28 वर्षीय युवकाची शेतात जनावरे चारण्यावरुन वाद झाला होता. गावातीलच चंद्रकुमार तुमळे यांच्या शेतात मागील वर्षी जनावरे चरण्यास गेला होता. यावरुन झालेल्या नुकसानीवरून वाद सुरू होता. यावरून गुरुदास रहांगडाले हा काल रात्री सदर युवक खर्रा घेण्यास गेला असता, तिघा बाप-लेकांनी मिळून या युवकास पकडून त्याच्यावर हल्ला करुन गंभीर जखमी केले.

उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू

गुरुदास याला नातेवाईकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचाराकरता नेले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला गोंदिया येथे पुढील उपचाराकरीता पाठवले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी बापाला आणि एका मुलाला ताब्यात घेतले असून, एक मुलगा अद्याप फरार आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा