टोमॅटोवरुन दोन भावांचा टोकाला वाद गेला, संतापलेल्या लहान भावाने ‘अशी’ घडवली अद्दल; वाचून तुम्हीही हैराण व्हाल !

मासिरामने अनेकदा त्याला टोमॅटो तोडू नको असे सांगितले. मात्र तो ऐकतच नव्हता. तरीही तो रोज टोमॅटो तोडून न्यायचा. नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी काशिराम छोट्या मासिरामच्या शेतात टोमॅटो तोडण्यासाठी पोहचला होता.

टोमॅटोवरुन दोन भावांचा टोकाला वाद गेला, संतापलेल्या लहान भावाने 'अशी' घडवली अद्दल; वाचून तुम्हीही हैराण व्हाल !
टोमॅटोवरुन झालेल्या वादातून भावाने भावाला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 8:37 PM

नर्मदा : मोठ भाऊ दररोज शेतातून टोमॅटो तोडून न्यायचा म्हणून संतापलेल्या लहान भावाने त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात घडली आहे. काशीराम असे हत्या करण्यात आलेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी सागबारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मासिराम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. क्षुल्लक कारणातून भावानेच भावाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मासिराम हा शेतकरी असून, त्याने त्याच्या शेतात टोमॅटो लावले होते. टोमॅटोचे पीकही चांगले आले होते. मासिरामचा मोठा भाऊ काशीराम हा दररोज त्याच्या शेतातील टोमॅटो तोडून न्यायचा. मासिरामला भावाचे हे कृत्य आवडत नव्हते.

अनेकदा सांगूनही काशिराम ऐकत नव्हता

मासिरामने अनेकदा त्याला टोमॅटो तोडू नको असे सांगितले. मात्र तो ऐकतच नव्हता. तरीही तो रोज टोमॅटो तोडून न्यायचा. नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी काशिराम छोट्या मासिरामच्या शेतात टोमॅटो तोडण्यासाठी पोहचला होता.

हे सुद्धा वाचा

टोमॅटोवरुन झालेल्या वादातून भावाकडून भावाची हत्या

यावेळी मासिरामने त्याला विरोध केला असता दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. याच दरम्यान मासिरामने काशिरामवर चाकूने हल्ला केला. यात काशिरामचा जागीच मृत्यू झाला.

हत्येप्रकरणी आरोपीला अटक

हत्येची माहिती गावकऱ्यांनी सागबारा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतेदह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. हत्या करणाऱ्या मासिरामला पोलिसांनी अटक केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.