ते गुपित पत्नीला कळले अन् दोघांमध्ये भांडण सुरु झाले, मग पतीने मुलीला शाळेत पाठवले अन्…

त्या दोघांचा सुखी संसार सुरु होता. पण एक दिवस अचानक पत्नीला पतीचे ते गुपित कळले. यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. मग पुढे जे झालं त्यानंतर एक मुलगी आईच्या प्रेमाला पोरकी झाली.

ते गुपित पत्नीला कळले अन् दोघांमध्ये भांडण सुरु झाले, मग पतीने मुलीला शाळेत पाठवले अन्...
पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवलेImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 10:18 AM

गुरुग्राम : मानेसरच्या कुकडौला गावात शेतात सापडलेल्या महिलेच्या धडाबाबत रहस्य उलगडण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पॉलिथिनच्या मदतीने या प्रकरणाची उकल केली आहे. अनैतिक संबंधासाठी पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. मानेसर गुन्हे शाखेच्या पथकाने अथक प्रयत्न करून आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी मृत महिलेचे डोके आणि पायही हस्तगत केले आहेत. मृतदेहाचे हात अद्याप पोलिसांना मिळाले नाहीत. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून घटनेत वापरलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे. आरोपी काही दिवसांपूर्वीच नौदलातून निवृत्त झाला होता.

तीन तासात हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली

मुलगी शाळेत गेल्यानंतर अवघ्या तीन तासात पत्नीची हत्या करून, आरोपीने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून पिशवीत भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते. यानंतर मानेसर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पतीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी फिर्याद नोंदवत तपास सुरु केला असता हे भयानक सत्य उघडकीस आले.

सीसीटीव्हीने फोडले पतीचे बिंग

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीत आरोपी दुचाकीवरून दोन बॅगांमध्ये काहीतरी घेऊन जाताना दिसला, मात् परत येताना त्याच्या हातात काही नव्हते. पोलिसांनी पतीची कसून चौकशी केली असता संपूर्ण घटना उघडकीस आली. आरोपीची ट्रेनमध्ये बिहारमधील एका मुलीशी भेट झाली होती. यानंतर या मुलीसोबत त्याचे अवैध संबंध होते. या संबंधातून त्या दोघांना एक मुलगाही झाला.

हे सुद्धा वाचा

ही बाब जेव्हा आरोपीच्या पत्नीला समजली, त्यानंतर दोघांमध्ये रोज भांडण व्हायचे. या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीचा काटा काढण्याचे ठरवले. मुलगी शाळेत गेल्यानंतर त्याने पत्नी सोनिया हिची हत्या करत मृतदेहाचे तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले, असे पोलीस जबाबात सांगितले. पोलीस आरोपींची सखोल चौकशी करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.