दहा वर्षांचं प्रेम एका क्षणात संपलं, त्या दोघांमध्ये असं काय घडलं की प्रेयसीनेच…

पत्नीच्या निधनानंतर त्याचं दुसऱ्या महिलेशी सूत जुळलं. दोघंही 10 वर्षे लिव्ह इन मध्ये राहिले. पण अखेर प्रेमात वादाची ठिणगी पडली अन् नको ते घडलं.

दहा वर्षांचं प्रेम एका क्षणात संपलं, त्या दोघांमध्ये असं काय घडलं की प्रेयसीनेच...
नागपुरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 6:34 PM

फरीदाबाद : दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. दहा वर्ष दोघं सोबत राहिले. पण अचानक एक दिवस प्रियकराच्या हत्येची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला. प्रेयसीनेच प्रियकराची हत्या केली. हत्या केल्यानंतर प्रेयसी पळून गेली. पण पोलिसांनी कसून शोध घेत दुसऱ्याच दिवशी तिला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. भूप सिंह असे मयत प्रियकराचे नाव आहे. सिंहच्या भावाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी प्रेयसीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा

भूप सिंह हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी होता. तर त्याची प्रेयसी गंगा उत्तराखंडची रहिवासी आहे. भूप सिंह पेशाने मिस्त्री होता. सिंहच्या पत्नीचे निधन झाले होते. यानंतर त्याची गंगाशी ओळख झाली. मग दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. दोघे आधी उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये राहत होते. मार्च 2023 पासून फरीदाबादला आले. दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा.

रोजच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची हत्या

भूपला दारुचे व्यसन होते. नशेत तो गंगाला मारहाणही करायचा. एकदा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असे गंगाने पोलीस चौकशीत सांगितले. रोजच्या वादाला आणि मारहाणीला कंटाळून गंगाने भूपला कायमचे संपवले. रविवारी तो नशेत असताना गंगाने त्याची हत्या केली. घटनेनंतर गंगा तेथून पळून गेली. पण अखेर पोलिसांनी तिला पकडलेच. पोलिसांनी गंगा अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.