दिल्लीला जाण्यास मनाई केली, माथेफिरु पुतण्याने काकूला यमसदनीच धाडली !
जयपूरमधील विद्याधरनगर परिसरातील लालपुरिया अपार्टमेंटमध्ये अनुज शर्मा आपली काकी सरोज शर्मासोबत राहत होता. अनुजला 11 डिसेंबर रोजी दिल्लीला जायचे होते.
जयपूर : दिल्लीला जाण्यास मनाई केल्याने माथेफिरु पुतण्याने विधवा काकूची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील जयपूरमध्ये घडली आहे. हत्या केल्यानंतर मार्बल कटर मशिनने मृतदेहाचे तुकडे करत जंगलात फेकले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी मृतदेहाचे काही तुकडे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अनुज शर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने काकू बेपत्ता झाल्याचा बनाव केला. पोलीस ठाण्यात जाऊन मिसिंगची तक्रारही दाखल केली. मात्र अखेर आरोपी जाळ्यात सापडलाच.
दिल्लीला जाण्यास मनाई केल्याने केली काकूची हत्या
जयपूरमधील विद्याधरनगर परिसरातील लालपुरिया अपार्टमेंटमध्ये अनुज शर्मा आपली काकी सरोज शर्मासोबत राहत होता. अनुजला 11 डिसेंबर रोजी दिल्लीला जायचे होते. मात्र काकू सरोजने त्याला दिल्लीला जाण्यास मनाई केली.
काकूने मनाई केल्याने अनुज संतापला आणि डोक्यात हातोडा घालून काकूची हत्या केली. यानंतर दुकानात जाऊन मार्बल कटर मशिन घेऊन आला. त्यानंतर बाथरुममध्ये नेऊन मृतदेहाचे 10 तुकडे केले आणि सुटकेस, बादलीमध्ये भरुन कारने जंगलात नेऊन फेकले. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊन काकू बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
‘असा’ उघड झाला गुन्हा
मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर आरोपी किचनमधील रक्ताचे डाग साफ करत होता. त्याचवेळी एका इसमाने हे पाहिले आणि घटनेचा खुलासा झाला. यानंतर सरोजच्या मुलीच्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
सरोजला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. सरोजचा मुलगा परदेशात राहतो. सरोजच्या पतीच्या निधनानंतर तिची देखभाल अनुज करत होता. अनुजचा संपूर्ण खर्च सरोजच करत होती. अनुजने बीटेकपर्यंत शिक्षण घेतले आहे.