बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंप लुटला, दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जळगावमधील एका पेट्रोल पंपावर मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. तोंडाला रुमाल बांधलेला एक बंदुकधारी पेट्रोल पंपावर आला.

बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंप लुटला, दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
बंदुकीचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना लुटलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 3:56 PM

जळगाव / अनिल केऱ्हाळे : बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना लुटल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये उघडकीस आली आहे. ही सर्व घटना पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डांगर शिवारात असलेल्या पांडुरंग पेट्रोल पंपावर ही घटना घडली. यावेळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या कारचालकाला ही आरोपीने लुटले. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

रात्रीच्या सुमारास बंदुकीचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना लुटले

अमळनेर-धुळे रस्त्यावरील डांगर शिवारात असणाऱ्या पांडुरंग पेट्रोल पंपावर काल मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमराास अज्ञात इसम आला. त्याने बंदुकीचा धाक दाखवून सुमारे 36 हजार 500 रुपये लुटून नेले. यावेळी पेट्रोल पंपावर किशोर रविंद्र पाटील आणि नरेंद्र सोनसिंग पवार हे कार्यरत होते. यावेळी चेहरा पूर्णपणे काळ्या रंगाच्या रुमालाने बांधलेला एक अनोळखी पुरुष आला आणि त्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना झोपेतून उठवले. त्याच्याजवळ असलेल्या पिस्टलचा दाखवून त्यांच्याकडे असलेले पेट्रोल-डिझेल विक्रीचे पैसे हिसकावून घेतले.

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकालाही लुटले

यादरम्यान एक चारचाकी चालक पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला. लुटारूने त्याच्या गाडीच्या डिक्कीला लाथा मारून चालकास गाडीबाहेर निघण्यास भाग पाडले. मग त्यालाही बंदुकीचा धाक दाखवत त्याच्या कानाखाली मारली. त्याच्याजवळ असलेले पाकिट हिसकावून तो पळाला. रस्त्यावर एक जण मोटरसायकल घेऊन उभा होता. ते दोघेही मोटरसायकलवर बसून धुळ्याकडे रवाना झाले.

हे सुद्धा वाचा

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

नरेंद्र पवार याच्याकडून 13 हजार 200, किशोर पाटील याच्याकडून 14 हजार 300 आणि इंडिका कारमध्ये डीझेल टाकण्यासाठी आलेल्या संजय भामरे यांच्याकडून 9 हजार रुपये असा एकूण 36 हजार 500 रुपये अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून चोरून नेले आहेत. याबाबत नरेंद्र पवार याने अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.