अचानक गावात दुर्गंधी सुटली, वास कुठून येतो याचा शोध घेतला, मग जे दिसलं पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली !

दीर वहिनीला भेटायला तिच्या घरी गेला. तेथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि दिराने वहिनीसह दोन पुतण्यांना संपवले. मग मृतदेह खड्ड्यात पुरले. पण एका गोष्टीमुळे सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.

अचानक गावात दुर्गंधी सुटली, वास कुठून येतो याचा शोध घेतला, मग जे दिसलं पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली !
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 1:25 PM

गुमला : झारखंडमधील गुमला येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून दिरानेच आपल्या विधवा वहिनी आणि दोन पुतण्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर तिन्ही मृतदेह शेणाच्या खड्ड्यात पुरले आणि आपल्या घरी निघून गेला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली. जिल्ह्यातील बसिया पोलीस स्टेशन हद्दीतील लुंगटू पदरा टोली गावात ही घटना घडली होती. अनोस कुंदलना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पतीच्या निधनानंतर दोन मुलांसह वेगळी राहत होती महिला

मयत महिलेच्या पतीचे 2017 मध्ये निधन झाले होते. तेव्हापासून ती आपल्या दोन मुलांसह वेगळी राहत होती. तर तिचे दोन्ही दीरही तिच्या घराच्या आसपास वेगवेगळे राहत होते. अनोस हा 24 मार्च रोजी वहिनी अर्पिताच्या घरी आला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की अनोसने वहिनीची हत्या केली. यावेळी आईला वाचवण्यासाठी आलेल्या दोन्ही मुलांनाही अनोस संपवले.

हत्या केल्यानंतर तिन्ही मृतदेह घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या शेणाच्या खड्ड्यात टाकून पुरले. यानंतर अनोस वहिनीच्या घराचा दरवाजा लावून आपल्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी अर्पिताचा दुसरा दीर विश्रामने तिचे दार बंद पाहिले. त्याला वाटले ती कुठेतरी गेली असेल, मात्र तीन दिवस उलटले तरी ती घरी परतली नाही. यामुळे घरच्यांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

हे सुद्धा वाचा

खड्ड्यातून वास सुटल्यानंतर घटना उघडकीस

पोलीसही 10 दिवस अर्पिता आणि तिच्या मुलांचा शोध घेत होते. मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. यादरम्यान मृतदेह सडायला लागल्याने त्या खड्ड्यातून प्रचंड दुर्गंधी पसरली होती. यामुळे पोलिसांनी सदर खड्डा खोदून पाहिले असता आत तिघांचे मृतदेह आढळले. यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

घटना उघड होताच अनोस गाव सोडून पळून गेला. मात्र गावकऱ्यांनी दुसऱ्या गावातून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संपत्ती आणि एलआयसीच्या पैशासाठी दीराने वहिनीला संपवल्याची माहिती कळते. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.