Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पगारही दिला नाही आणि दिवाळीला सुट्टीही दिली नाही, संतप्त कर्मचाऱ्यांनी मालकाला ‘अशी’ घडवली अद्दल

अजय गोस्वामी याचे रायपूरमध्ये महाराजा मॅगी पॉईंट नावाचे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये सागर सैयाम आणि चिन्मय साहू दोघे काम करत होते. गोस्वामीचा या दोन कर्मचाऱ्यांशी पैशाचा वाद सुरु होता.

पगारही दिला नाही आणि दिवाळीला सुट्टीही दिली नाही, संतप्त कर्मचाऱ्यांनी मालकाला 'अशी' घडवली अद्दल
पैसे आणि सुट्टीच्या वादातून कर्मचाऱ्यांनी केली मालकाची हत्याImage Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 8:45 PM

रायपूर : दिवाळीसाठी सुट्टी दिली नाही म्हणून दोन कर्मचाऱ्यांनी मालकाची हत्या (Workers Killed Owner) केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील रायपूर (Raipur Jharkhand) येथे मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी अर्ध्या तासात दोन्ही आरोपींना अटक (Accused Arrested) केली आहे. सागर सिंह सैयाम आणि चिन्मय साहू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अजय गोस्वामी असे हत्या झालेल्या मालकाचे नाव आहे. आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय गोस्वामी याचे रायपूरमध्ये महाराजा मॅगी पॉईंट नावाचे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये सागर सैयाम आणि चिन्मय साहू दोघे काम करत होते. गोस्वामीचा या दोन कर्मचाऱ्यांशी पैशाचा वाद सुरु होता.

अनेक महिन्यांपासून मालक पगार देत नव्हता

गेल्या अनेक महिन्यांपासून गोस्वामीने कर्मचाऱ्यांना वेतन दिले नव्हते. यावरुन कर्मचारी आणि मालकामध्ये नेहमी वाद व्हायचा. दिवाळीचा सण असातनाही मालकाने पैसे दिले नाही, शिवाय सुट्टीही दिली नाही.

हे सुद्धा वाचा

मालकाने मारहाण करताच कर्मचाऱ्यांनी केली हत्या

अजयने दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी या दोघांना काम करण्यास सांगितले. यावर दोघांनीही काम करण्यास नकार दिला. यामुळे अजयने दोघांना दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी अजयला लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या केली.

पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी पकडले

हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली. आरोपी गावी पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना बस स्टँडवर पकडले.

वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल..
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल...
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
अहिल्यादेवी पुण्यतिथी कार्यक्रमाला दादांना बोलवणार नाही, कारण - पडळकर
अहिल्यादेवी पुण्यतिथी कार्यक्रमाला दादांना बोलवणार नाही, कारण - पडळकर.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना.
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?.
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प.