‘त्या’ दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम, अचानक दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला, तरुणाला दुरावा सहन झाला नाही अन्…

दोघांचे प्रेमसंबंध सुरु होते. पण अचानक दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. पण हा दुरावा तरुणाला सहन झाला नाही. मग जे घडले त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

'त्या' दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम, अचानक दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला, तरुणाला दुरावा सहन झाला नाही अन्...
प्रेमप्रकरणातील वादातून प्रेयसीनेच प्रियकराला संपवलेImage Credit source: google
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 10:50 PM

रांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. प्रेमात आलेला दुरावा सहन न झाल्याने प्रियकराने प्रेयसीची हत्या करत मग स्वतःही जीवन संपवल्याची घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी तरुणाने फेसबुक लाईव्ह करत प्रेयसीच्या हत्येची माहिती दिली. मग आपणही तिच्याकडे जात आहे म्हणत जीवन संपवले. तसेच आपल्या बहिणींना स्वतःचे लोकेशनही पाठवले. अंकित असे मयत तरुणाचे नाव आहे. अर्गोरा पोलीस स्टेशन हद्दीतील हरमू परिसर शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलीस त्याचे लोकेशन ट्रेस करत त्याच्यापर्यंत पोहचत होते. पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

निवेदिताच्या घरच्यांमुळे दोघांमध्ये दुरावा आला

मिळालेल्या माहितीनुसार, निवेदिता आणि अंकित यांचे एकमेकांवर प्रेम होते. पण दोघांच्या नात्याची माहिती निवेदिताच्या घरच्यांना झाली. यानंतर निवेदिता अंकितपासून दूर राहू लागली. अंकितने फोन करु नये म्हणून निवेदिताने आपला मोबाईल नंबरही बदलला. पण अंकितच्या डोक्यातून प्रेमाचे वेड जात नव्हते. निवेदिता आणि त्याच्यामधीव दुरावा त्याला सहन होत नव्हता.

दुरावा सहन होत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

यातूनच अंकितने शुक्रवारी सायंकाळी निवेदितावर गोळ्या झाडून तिची हत्या केली. निवेदिताची हत्या केल्यानंतर अंकित तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत निवेदिताचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. एफएसएल टीमने घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला.

हे सुद्धा वाचा

निवेदिताच्या हत्येप्रकरणी अंकितचे नाव समोर येताच पोलीस त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलीस अंकितपर्यंत पोहोचण्याआधीच अंकितने स्वत:वर गोळी झाडली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ज्या पिस्तुलाने त्याने आपल्या मैत्रिणीची हत्या केली होती, त्याच पिस्तुलाने अंकितने दुसऱ्या दिवशी स्वतःवर गोळी झाडली. मरण्यापूर्वी अंकितने फेसबुक लाईव्ह करत प्रेयसीची हत्या केल्याची कबुली देत आपणही तिच्याकडे जात असल्याचे सांगितले. तसेच त्याने आपल्या बहिणींना आपले लोकेशनही पाठवले होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.