संशय आला म्हणून बंद चाळींवर पोलिसांनी छापा टाकला, छापेमारी केली तर धक्कादायक प्रकार उघड

गोवंश तस्करांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. या कारवाईअंतर्गत पोलिसांनी धाडसत्र सुरु केलं आहे. यामुळे गोवंश तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

संशय आला म्हणून बंद चाळींवर पोलिसांनी छापा टाकला, छापेमारी केली तर धक्कादायक प्रकार उघड
कल्याणमध्ये गो-तस्करांवर कारवाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 12:06 PM

कल्याण : ठाणे जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या. काही दिवसांपूर्वी शहापूर, मुरबाड, कल्याण तालुक्यातील अनेक ठिकाणी गोवंश चोरी करून त्यांची तस्करी होत होती. यामुळे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी गोवंश तस्करांविरोधी कठोर कारवाई करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची योजना आखली. त्यानंतर पोलिसांनी शहापूर, कल्याण, मुरबाड, पडघा अशा विविध ठिकाणी धडक कारवाई करत गोवंश तस्करांचे धाबे आवळले आहेत. या कारवाई दरम्यानच टिटवाळा पोलिसांनी खडवली जवळ असलेल्या राये गावात मोठी कारवाई करत कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आलेल्या गाईंची गोवंश तस्करांकडून सुटका केली.

गुप्त माहितीवरुन पोलिसांनी छापा टाकला

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर टिटवाळ्यात मोठ्या प्रमाणात गो तस्करांकडून गोवंशाची तस्करी सुरू असल्याची माहिती कितवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कितवा पोलिसांनी टिटवाळा परिसरातील राये गावातील निर्जन परिसरातील अनधिकृत आणि अर्धवट बांधलेल्या चाळींवर छापा टाकला. छापेमारीत खोल्यांमध्ये डांबून ठेवलेल्या 46 गाईंची सुटका करत गुन्हा दाखल केला आहे.

बकरी ईदच्या दरम्यान या सर्व गाईंची कत्तल करुन मोठ्या प्रमाणात याचं मांस महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी नेणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ही कारवाई मुरबाड उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे, मुरबाड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, कुळगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोई, कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि टिटवाळा पोलीस स्टेशनचे 25 ते 30 पोलीस कर्मचाऱ्यांनी बजरंग दलच्या मदतीने ही कारवाई यशस्वीपणे केली. याप्रकरणी पुढील तपास आता पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.