वाहनांची तोडफोड करणाऱ्यांनंतर दारुड्यांचा धिंगाणा, उच्चशिक्षित तरूणही आता मागे नाही

कल्याणमध्ये भररस्त्यात धिंगाणा करण्यात आता उच्चशिक्षित तरुणही मागे नाहीत. मध्यरात्रीच्या सुमारास उच्चशिक्षित तरुण दारुच्या नशेत परिसरात धिंगाणा करु लागले.

वाहनांची तोडफोड करणाऱ्यांनंतर दारुड्यांचा धिंगाणा, उच्चशिक्षित तरूणही आता मागे नाही
उच्चशिक्षित तरुणांचा दारु पिऊन रस्त्यात राडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 9:53 PM

कल्याण / सुनील जाधव : कल्याण-डोंबिवलीत तरुणांचा धिंगाणा थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. गेले काही दिवस दारुन पिऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्या गँगने नागरिकांना हैराण केले होते. मात्र आता उच्चशिक्षित तरुणांनी यात भर घातल्याचे दिसून येते. मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने गाडी चालवत गाडीमध्ये मोठ मोठ्याने धार्मिक गाणे लावत धिंगाणा घालणाऱ्या चार तरुणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण पश्चिम रेतीबंदर परिसरात ही घटना घडली. तुषार गाढवे, नितीन भोंडिवले, आकाश सानप, प्रथम पवार अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. विशेष म्हणजे हे चारही तरुण उच्च शिक्षित आहेत.

मध्यरात्री गाडीत मोठ्याने धार्मिक गाणी लावून तरुणांचा धिंगाणा

कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण रेतीबंदर परिसरात रात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी गाडीत काही तरुण आले, त्यांनी घोषणबाजी सुरू केली. गाडीमध्ये मोठ्या आवाजात धार्मिक गाणी लावली होती. तरुणांचे हे कृत्य पाहून परिसरात गोंधळ उडाला. या परिसरात रमजान असल्याने पहाटे दुकान लागतात. हा गोंधळ पाहून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. चौघे तरुण दारूच्या नशेत होते. याबाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती देण्यात आली.

बाजारपेठ पोलिसांकडून आरोपी अटक

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे हे चारही तरुण उच्चशिक्षित असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. या चार तरुणांविरोधात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. सतर्क नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि पोलीस वेळेवर पोहोचले म्हणून या तरूणांच्या हातून संभाव्य मोठा अनर्थ टळला.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.