रात्री रुममध्ये झोपला होता पती, सकाळी जमिनीतून मृतदेह निघाला; नेमके काय घडले?

सकाळी घरच्यांनी उमेश कुठे दिसत नाही म्हणून मोनिकाला विचारले. मात्र मोनिकाने काहीच उत्तर दिले नाही. यामुळे घरच्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मोनिकाची चौकशी केली.

रात्री रुममध्ये झोपला होता पती, सकाळी जमिनीतून मृतदेह निघाला; नेमके काय घडले?
फोनला उत्तर देत नव्हती म्हणून प्रेयसीवर अत्याचारImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 5:19 PM

कानपूर : पती-पत्नीतील वादातून पतीची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. प्रकरण उघडकीस येताच कुटुंबीयांसह पोलीसही चक्रावून गेले. पत्नीने पतीची हत्या केल्यानंतर मृतदेह रुममध्येच गाडला. सकाळी कुटुंबीयांनी मुलाबद्दल विचारले असता तिने काहीच उत्तर दिले नाही. यामुळे घरच्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. मोनिका यादव असे आरोपी पत्नीचे तर उमेश यादव असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

पतीशी वाद झाल्यानंतर त्याची हत्या केली

उमेशला दारुचे व्यसन होते. यावरुन पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे दोघांमध्ये वाद झाला. यामुळे मोनिकाच्या मनात पतीवर राग होता. रात्री पती झोपल्यानंतर मोनिकाने पतीची गळा चिरुन हत्या केली. हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी पतीचा मृतदेह तिने खोलीतच गाडला.

सकाळी घरच्यांनी शोध सुरु केला असता घटना उघडकीस

सकाळी घरच्यांनी उमेश कुठे दिसत नाही म्हणून मोनिकाला विचारले. मात्र मोनिकाने काहीच उत्तर दिले नाही. यामुळे घरच्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मोनिकाची चौकशी केली.

हे सुद्धा वाचा

याचदरम्यान पोलिसांचे लक्ष मृतदेह जेथे पुरला होता त्या ठिकाणी गेले. पोलिसांनी तेथील माती बाजूला केली असता जमिनीत उमेशचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे कुटुंबीय आणि पोलीस सुन्न झाले.

पोलिसांकडून आरोपी पत्नीला अटक

यानंतर पोलिसांनी मोनिकाची कसून चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी मोनिकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत, तिला अटक केली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ माजली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.